‘मी जर हिंदू असतो तर…’; शाहरूखचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

On: December 20, 2022 4:14 PM
---Advertisement---

मुंबई | नुकतंच बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खानच्या(Shah Rukh Khan) ‘पठाण'(Pathaan) चित्रपटातील ‘बेशरम’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात शाहरूखसोबत दीपिका पादुकोन((Deepika Padukone) झळकली आहे. परंतु हे गाणं रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.

या गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीशी राजकीय, धार्मिक अर्थ जोडले आहेत, असं म्हणत नेटकऱ्यांनी पठाण चित्रपट प्रदर्शित न होऊन देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. या गाण्याला काही राजकीय नेत्यांनीही विरोध केला आहे.

या गाण्याचा वाद सुरू असतानाच शाहरूखनं पूर्वी दिलेली एक प्रतिक्रिया चर्चेत आहे. त्यावेळी शाहरूख म्हणाला होता की, आपण जर हिंदू असतो तर या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या का?, असा प्रश्न शाहरूखनं उपस्थित केला होता.

सोशल मीडियावर जे व्हायरल होतं त्यावरून नेटकऱ्यांना विचार करण्याची सवय लागली आहे. जी सवय फार चुकीची आहे, असंही शाहरूख म्हणाला होता. सध्या शाहरूखच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now