Ibrahim Khan | इब्राहिम अली खानने अलीकडेच आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य करताना सांगितले की, तो खूप लहान होता म्हणून त्याला त्या काळातील फारशा आठवणी नाहीत. मात्र, सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांनी आपल्यावर योग्य संस्कार करत उत्तम पालनपोषण केल्याचं त्याने कौतुकाने म्हटलं आहे.
आई-वडिलांनी दिला सुरक्षिततेचा अनुभव-
दिलेल्या एका मुलाखतीत इब्राहिमने (Ibrahim Khan) सांगितलं की, “माझ्या आई-वडिलांनी कधीच मला तुटलेल्या कुटुंबाचा त्रास होऊ दिला नाही. त्यांनी असं वातावरण निर्माण केलं की मला कधीच दुखः जाणवलं नाही.” त्याच्या मते, लहानपणी त्याने आई-वडिलांमध्ये फारसा वाद किंवा शत्रुत्व पाहिलं नाही आणि त्यामुळेच त्याला कायम सुरक्षितता आणि प्रेम मिळालं.
View this post on Instagram
इब्राहिमने स्पष्ट केलं की त्याचे वडील सैफ अली खान आता करिनासोबत (Kareena Kapoor) खूप आनंदी आहेत आणि त्यालाही दोन गोंडस, खोडकर भाऊ मिळाले आहेत. त्याच्या या वक्तव्याने त्याच्या घरातील प्रेमळ नातेसंबंध आणि सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित होतो.
करिनासोबतचा नवीन संसार आणि दोन भाऊ-
सैफ अली खान आणि करिना कपूर यांचं नातं खूप आनंदी आहे, असं इब्राहिम (Ibrahim Khan) म्हणतो. त्याने आपल्या भावांबाबतही खास भाष्य करत त्यांना ‘हँडसम आणि खोडकर’ असं संबोधलं. तिन्ही भावांमध्ये चांगलं नातं असल्याचंही त्याच्या बोलण्यातून जाणवतं.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत असलेल्या इब्राहिमने आपल्या कुटुंबाच्या संघर्षाचा उल्लेख न करता, त्या काळातील सकारात्मक बाजू अधोरेखित केली. त्यामुळे इब्राहिमचा परिपक्व दृष्टिकोन आणि त्याच्या पालकांनी दिलेली संस्कृती स्पष्टपणे जाणवते.






