Ahmedabad plane crash survivor | अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेत 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या भीषण अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचला तो म्हणजे रमेश विश्वकुमार (वय 40), सीट नंबर 11A. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, स्वतः रमेश यांनी आपल्या थरारक अनुभवाची माहिती दिली आहे.
“सीटसह बाहेर फेकलो गेलो” – रमेश यांची प्रत्यक्ष वर्णना :
रमेश यांनी सांगितले की, “विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो कदाचित इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा. वरच्या भागात मोठी आग लागली होती. मी सीटसह खाली फेकलो गेलो आणि त्या भागातून कसा तरी रेंगाळत बाहेर पडलो. दरवाजा तुटलेला होता, समोर रिकामी जागा दिसताच मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.” (Ahmedabad plane crash survivor)
“माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस आणि एक काका-काकू पूर्णपणे जळत होते. लोक आगेमध्ये अडकले होते आणि मदतीसाठी आरडाओरड करत होते,” असे सांगताना रमेश यांचा आवाज भरून आला. अपघातात त्याचा डावा हात गंभीरपणे भाजला आहे, पण त्यांचा जीव वाचला, हेच त्यांच्या कुटुंबासाठी सध्या आश्वासक ठरतं आहे. (Ramesh Vishvkumar)
Ahmedabad plane crash survivor | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयात भेट घेतली :
रमेश विश्वकुमार यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रुग्णालयात गेले. तिथे त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि रमेश यांचे धैर्य पाहून त्यांचे कौतुक केले. (Ahmedabad plane crash survivor)
या अपघातानंतर चौकशी प्रक्रियेला गती मिळाली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, त्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आहे. यामधून टेकऑफ दरम्यान काय घडलं, पायलट्समधील संवाद, सिग्नल्स आणि तांत्रिक बिघाडांची माहिती समजण्याची शक्यता आहे. यामुळे अपघाताचं खरं कारण उलगडण्यास मदत होणार आहे.
एकट्याने वाचलेलं शरीर, पण डोळ्यासमोर अजूनही धुरकटलेले मृत क्षण :
रमेश विश्वकुमार (Ramesh Vishvkumar) यांचे शारीरिक जखमा बऱ्या होतील, पण त्यांच्या मनावर कोरले गेलेले क्षण… ते कधीही पुसले जाणार नाहीत. एका मृत्यूच्या अंधारातून वाचलेला हा एकमेव साक्षीदार – आता संपूर्ण देशासाठी धैर्य, दु:ख आणि नियतीच्या कठोरतेचं प्रतीक बनला आहे.






