‘माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मी निर्दोष आहे’, शिझान खानची प्रतिक्रिया

On: January 2, 2023 11:55 AM
---Advertisement---

मुंबई| गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांना आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता.

तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधी तिचा बाॅयफ्रेंड शिझान खानशी(Sheezan Khan) ब्रेकअप झाला होता. शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानं तिनं आत्महत्या केली, असं म्हणत तुनिषाच्या आईन तिच्या आत्महत्येला शिझान खानला जबाबदार ठरवत त्याच्यवर गंभीर आरोप केले होते.

या प्रकरणी शिझान सध्या पोलिस कोठडीत आहेत. यापूर्वी शिझान या प्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हणाला होता की, श्रद्धा वालकर प्रकरणामुळं मी अस्वस्थ झालो होतो. आपलं प्रेम असलं तरी आपल्या प्रेमात धर्म येणार आणि आपल्या वयातही अंतर आहे, असं म्हणत मी तुनिषाशी ब्रेकअप केला होता.

शनिवारी शिझानला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात हजर राहण्यापूर्वी त्यानं आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच मीडियाशी संवाद साधला.

मीडियाशी संवाद साधताना तो म्हणाला की, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी निर्दोष आहे. सत्यमेव जयते. शिझाननं दिलेली ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, शिझान या प्रकरणी सोमवारी न्यायालयात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती शिझानच्या वकिलांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now