Hyundai 7 Seater Car | तुम्ही जर नव्या वर्षात नवी गाडी (New Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ह्युंदाई कंपनीने मोठी गुड न्यूज दिलीये. ह्युंदाई कंपनी नवीन 7 सीटर कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Hyundai ने दिली मोठी गुड न्यूज
ह्युंदाई कंपनी Stargazer ही सेव्हन सीटर कार लॉन्च करणार आहे. ही गाडी केव्हा लॉन्च होणार याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये ही गाडी भारतीय बाजारात लवकरच येऊ शकते असं बोललं जात आहे. कंपनीच्या माध्यमातून 16 जानेवारी 2024 ला क्रेटा या लोकप्रिय मॉडेलचं फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केलं जाणार आहे.
Hyundai च्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय सूट
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ह्युंदाईने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपनीने आपल्या निवडक वाहनांवर सूट जाहीर केली आहे.
Hyundai Grand i10 ही कंपनीची हॅचबॅक सेगमेंट कार आहे. ज्यावर कंपनी कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट फायदे आणि इतर अनेक ऑफर्स देत आहे. जानेवारी 2024 मध्ये ही कार खरेदी करून तुम्हाला एकूण 48,000 रुपयांची सूट मिळू शकते.
कंपनी ह्युंदाई ग्रॅंड i20 कारवर 60,000 रुपये आणि त्याच्या N-Line प्रकारावर 50,000 रुपयांची सूट देत आहे. तुम्हाला ही कंपनीची कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
या महिन्यात ह्युंदाई वेरना खरेदी करून तुम्ही एकूण रु. 55,000 चा लाभ घेऊ शकता. कंपनी 2024 मध्ये Hyundai Alcazar वर एकूण 45,000 रुपयांची सूट देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Shruti Marathe | ‘तू माझ्यासोबत झोपली तर…’; श्रुती मराठेचा अत्यंत धक्कादायक खुलासा
Bigg Boss 17 | सुशांतबद्दल बोलू नकोस, कारण तुझ्या सासरचे… अंकिताला आईचा मोठा सल्ला
Team India | भारतीय संघाच्या भल्यासाठी काम करायचंय; Yuvraj Singh ने मागितलं महत्त्वाचे पद
Congress ला मुंबईत मोठं खिंडार; माजी खासदार Milind Deora यांचा पक्षाला जय महाराष्ट्र!
Ram Mandir | “बाबरवर जास्त प्रेम, रामावर नाही…”, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल






