“पत्नीने स्वतःचा पॅार्न व्हिडिओ इंटरनेटवर टाकला”, पतीच्या आरोपांवर न्यायालयाचा मोठा निर्णय

On: April 28, 2025 6:25 PM
nagpur
---Advertisement---

Nagpur | पत्नीने स्वतःचा पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केल्याचा आरोप करणाऱ्या पतीची दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पतीने पत्नीविरोधात पोलीस तक्रार दाखल करून तिच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्टपणे ही मागणी अमान्य केली आहे.

पतीच्या आरोपावर उच्च न्यायालयाचा झटका-

पतीने आपल्या पत्नीने स्वतःचा अश्लील व्हिडीओ इंटरनेटवर टाकल्याचा गंभीर आरोप करत तिला अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयात (Nagpur) केली होती. मात्र, न्यायालयाने याचिकेची सुनावणी करताना हा प्रकार फौजदारी गुन्ह्यांत मोडत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, पत्नीने जर स्वतःची क्लिप इंटरनेटवर टाकली असेल, तर त्यात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर घटनांची माहिती-

या प्रकरणात, ६ फेब्रुवारी २०१५ रोजी पतीने पत्नीवर (Nagpur) अश्लील व्हिडीओ इंटरनेटवर प्रसारित केल्याचा आरोप केला होता. संबंधित तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, पतीने केलेल्या आरोपांमध्ये कोणताही फौजदारी गुन्हा होत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही.

न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, एखाद्या व्यक्तीने स्वतःचा व्हिडीओ प्रसारित केल्यास तो फौजदारी गुन्हा ठरत नाही. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिस कारवाईसाठी न्यायालयाचा आदेश आवश्यक नाही. परिणामी, पतीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

News Title – Husband’s Plea in Wife’s porn Video Case in nagpur

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now