बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

On: February 20, 2024 2:40 PM
SSC-HSC Result 2025
---Advertisement---

HSC Board Exam | बारावीच्या परीक्षा उद्यापासून (21 फेब्रुवारी) सुरू होत आहेत. त्यापुर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेला (HSC Board Exam) जाण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी ही माहिती जाणून घ्यावी.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही घोषणा केल्या आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. बोर्डाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक दहा मिनिटांचा वेळ वाढून देण्यात आला आहे. म्हणजेच आता विद्यार्थी हे अतिरिक्त दहा मिनिटे (HSC Board Exam) पेपर सोडू शकतात. परीक्षेला दिलेला वेळ संपल्यानंतर हे अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार आहेत.

बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान, होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1मार्च ते 26 मार्च या कालवधीत होणार आहे. सकाळ सत्रात परीक्षा असणार्‍या विद्यार्थ्यांना सकाळी 10 : 30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे आवश्यक असणार आहे.

सकाळच्या सत्रात 11 वाजता पेपर सुरू होणार आहेत. तर, दुपार सत्रातील पेपर 3 वाजता पेपर सुरू होणार असल्याने
2:30 वाजता वर्गात येवून बसावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी लवकरच घरातून बाहेर पडावे.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकची नियुक्ती

यंदा बोर्डाने परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक यांची नियुक्ती देखील केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना काही नंबर देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ठराविक (HSC Board Exam) विषयांसाठी कॅल्क्युलेटरसाठी देखील परवानगी देण्यात आलीये.

हॉलतिकीट विसरले तर..

यासोबतच जर एखाद्या विद्यार्थ्याचे हॉलतिकीट विसरले असेल तर तो विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकतो. मात्र, त्याला हमी द्यावी लागणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC Board Exam)स्पष्ट करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणात राहू नये, असे आवाहन बोर्डाने केले आहे.

News Title – HSC Board Exam additional 10 minutes in Exam

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ महिला पुरूषांसाठी असतात लकी

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन

शरद पवार गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

सर्वांत मोठी बातमी ! मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार

विशेष अधिवेशनापुर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा!

Join WhatsApp Group

Join Now