मुलगी कशी हवीये?; आदित्य ठाकरेंनी अखेर सांगितलं

On: April 15, 2023 12:43 PM
---Advertisement---

मुंबई | आदित्य ठाकरे लग्न कधी करणार? हा प्रश्न अनेकदा चर्चेत येत आहे, यावर आदित्य ठाकरेंनी खळखळून हसत उत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी नुकतंच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी लग्नावर भाष्य केलंय. मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंना लग्नासंबंधित प्रश्न विचारण्यात आला.

यावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. पण राजकारणातील मुलीशी लग्न करायचं नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

लग्नासाठी राजकारणातील मुलगी बिलकूल नको. मला लग्नासाठी मुलगी कशी हवी आहे? यावर कुणीतरी जनहित याचिका दाखल केली पाहिजे, असं मला वाटतं, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. आदित्य ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now