संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ ठरणार की अशुभ?, वाचा राशीभविष्य

On: March 28, 2024 3:14 PM
Horoscope Today 28 march 
---Advertisement---

Horoscope Today | आज संकष्टी चतुर्थी आहे. महिन्यात दोन चतुर्थी येतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशाची पूजा केली जाते. कृष्ण पक्षाची चतुर्थी ही संकष्टी श्री गणेश चतुर्थी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी ही वैनायकी श्री गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. आज 28 मार्चचा दिवस शुभ असेल की अशुभ याची माहिती या लेखात दिली आहे.

आज काही राशी साठी दिवस शुभ ठरणार आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशीपैकी काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ असणार आहे. आजचे राशी भविष्य कसे असणार, याबाबत खाली सर्व माहिती दिली आहे.

आजचे राशी भविष्य

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या पार्टनरची साथ मिळेल. तुमच्या मनाप्रमाणे आज तुमची कामे होतील. आज खरेदी योग आहे. वाहन खरेदी कराल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल.आज तुमची आनंदी राहाल.

मेष : आज तुम्हाला धीर धरावा लागणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद होऊ शकतात. त्यामुळे जास्त चीडचीड करू नका. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.विचारपूर्वक नियोजन करून (Horoscope Today ) कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल.

मिथुन : आज तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत तुमचा आत्मविश्वास वाढेल.आर्थिक लाभ नक्की होईल. कुटुंबात तुम्हाला पाठिंबा मिळेल. सहकार्य मिळेल. फक्त मनाला शांत ठेवा. धाडस दाखवाल तर यश नक्की मिळेल. मनापासून काही कराल तर त्यात प्रगती होईल.

कर्क: आज आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत.आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. आज तुमचा दिवस धावपळमध्ये जाईल.

सिंह : विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक (Horoscope Today ) स्नेह निर्माण होईल. आज तुमची सर्व कामे मार्गाला लागतील. तुमची पैशाची कामेही होतील. मित्रांची आणि कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. तुमचा दिवस उत्साही जाईल.

कन्या : मनस्तापा सारख्या घटना घडतील. अधिक पैसा खर्च कराल. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. पैसे विचार करून खर्च करा. आर्थिक घाटा होऊ शकतो.येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.

News title – Horoscope Today 28 march 

महत्वाच्या बातम्या-

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा

‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now