Hinjewadi Shivajinagar Metro | पुण्यातील महत्त्वाच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मार्च अखेरपर्यंत ही सेवा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेमुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे मेट्रो प्रवासासाठी नागरिकांना अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Pune Metro Line 3)
मेट्रो सेवा सुरू होण्यास विलंब :
पुणे (Pune) शहरातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 प्रकल्पाबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. या मार्गिकेचे काम पूर्ण होऊन मार्च महिन्याच्या अखेरीस सेवा सुरू होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र सध्या काही तांत्रिक कामे पूर्ण न झाल्यामुळे आणि आवश्यक परवानग्या अद्याप मिळाल्या नसल्यामुळे ही सेवा लगेच सुरू होऊ शकणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Hinjewadi Shivajinagar Metro)
मिळालेल्या माहितीनुसार ही मेट्रो सेवा आता जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरात काम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना या मार्गावरून प्रवास करण्याची अपेक्षा होती. मात्र प्रकल्पाच्या विलंबामुळे त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
Hinjewadi Shivajinagar Metro | 23.5 किमी मार्गावर 23 स्थानके :
हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन सुमारे 23.5 किलोमीटर लांबीची आहे आणि या मार्गावर एकूण 23 स्थानके असणार आहेत. यापैकी काही स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी अजूनही सुमारे 10 ते 12 स्थानके पूर्ण व्हायची आहेत. ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. (Hinjewadi Shivajinagar Metro News)
या मेट्रो मार्गावर एम्बेसी क्वाड्रोन बिझनेस पार्क, डोहलेर, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी आणि वाकड चौक यांसारख्या गर्दीच्या भागांमध्ये स्थानके असतील. तसेच बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रिकल्चर कॉलेज आणि शिवाजीनगर अशी महत्त्वाची ठिकाणे या मार्गावर जोडली जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






