नौदल आधिकाऱ्याची पत्नी हिमांशी नरवालबद्दल मोठी माहिती समोर, एल्विश यादवसोबत खास नातं!

On: April 25, 2025 8:29 PM
himanshi narwal
---Advertisement---

Himanshi Nalwar | पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध व्यक्तींच्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओंनी सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे. विशेषतः एका महिलेला आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसलेले पाहून प्रत्येकजण हादरला. या शहीद व्यक्तीचा परिचय फक्त एक सामान्य नागरिक म्हणून नसून, तो भारतीय नौदलातील (Navy Officer) अधिकारी होता.

हल्ल्यानंतर सर्वत्र रोष व्यक्त होत आहे आणि प्रत्येक जण या क्रूर घटनेचा बदला घेण्याची मागणी करत आहे. या प्रकरणात एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात हिंदू पर्यटकांना वाचवण्यासाठी एका काश्मिरी व्यक्तीचा मसीहा बनल्याचा उल्लेख आहे.

हिमांशीचा परिचय –

व्हायरल छायाचित्रातील महिलेचे नाव हिमांशी (Himanshi Nalwar) असल्याचे उघड झाले असून, धक्कादायक बाब म्हणजे ती प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) यांची वर्गमैत्रीण आहे. एल्विशने स्वतः हा व्हिडिओ शेअर करत या गोष्टीचा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)

एल्विशच्या म्हणण्यानुसार, त्याचा एका कॉमन मित्राशी संवाद झाला होता. एल्विशने सांगितले, “ज्या क्षणी मी कॉल केला आणि स्वतःचे नाव सांगितले, तेव्हा समोरून लगेच उत्तर आले की हो, हीच हिमांशी आहे.” एल्विशने असेही सांगितले की, त्याने सुमारे ३० वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ३१व्या प्रयत्नात कॉल उचलण्यात आला, आणि त्यानंतर हिमांशीने जोरात रडायला सुरुवात केली, ज्यामुळे तिची ओळख निश्चित झाली.

एल्विश यादवच्या भावना आणि लोकांची प्रतिक्रिया-

एल्विश यादव यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हिमांशीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. एल्विश आपल्या वर्गमैत्रिणीबद्दल अत्यंत दुःखी असून तिच्या दुःखात संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्या एल्विश यादवच्या या भावनिक खुलास्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी एल्विशने हिमांशीची भेट घ्यावी अशी मागणी केली आहे. मात्र, एल्विश पुढे काय पाऊल उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एल्विशचा भावनिक व्हिडिओ पाहून अनेकांना डोळे पाणावले आहेत.

News Title – himanshi narwal is classmate of elvish yadav

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now