“तिचा ॲटिट्यूड प्रॉब्लेम”, अमिषा पटेलवर का संतापले गदर-2 चे दिग्दर्शक

On: August 29, 2023 4:34 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर 2’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी अनेक पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’च्या या दुसऱ्या भागात अमिषा पटेल तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा सकिनाच्या भूमिकेत दिसलीये.

‘गदर 2’ सध्या खूप चर्चेत आहे. कारण बॉक्सऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. पण त्याआधी हा चित्रपट चर्चेत आला होता. कारण अमीषा पटेलने दिग्दर्शक अनिल शर्मांवर आरोप केले होते.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, अमिषा पटेलने दिग्दर्शक-निर्माता अनिल शर्मा यांच्यावर चंदीगडच्या शूटिंग शेड्यूलदरम्यान सेटवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला होता. आता अनिल शर्मा यांनी अमिशाच्या आरोपांवर पहिल्यांदाच एका मुलाखतीत भाष्य केलंय.

अमिषा ही श्रीमंत घरातून आली असल्याने कधी कधी तिच्या स्वभावातून ते दिसून येतं, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर जेव्हा तिला ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी निवडलं होतं, तेव्हा ती फारशी चांगली अभिनेत्री नव्हती, असं अनिल शर्मा यांनी सांगितलं. आधीच्या गदर चित्रपटाच्या वेळी तिच्यासोबत वाद झाला होता. ती मोठ्या घराची मुलगी आहे, तिचे काही नखरे वेगळे आहेत. मात्र ती मनाने चांगली आहे. श्रीमंत घरातून आलेल्यांचे कधी कधी नखरे सहन करावे लागतात, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही तर छोट्या घरातून आलो आहोत. आम्ही एकमेकांशी प्रेमाने वागतो आणि राहतो. तीसुद्धा इतरांशी प्रेमाने राहते पण तिचा थोडा ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे, असं अनिल शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘गदर 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now