Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्याबदल वेगवेगळे तर्क-विर्तक लावले जात आहेत. शिवाय या दोघांबदल रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहे. या सोबतच बच्चन कुटुंबातील अनेकांनी ऐश्वर्यावर अनेक आरोप देखील केले आहेत. तर दुसरीकडे ऐश्वर्याला अमिताभ बच्चनने अनफाॅलो केल्याची माहिती समोर आली आहे.
ऐश्वर्याला केलं अनफाॅलो?
अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायला अनफाॅलो केल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवर या मागचं कारण सांगितलं आहे. त्यांनी आपल्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, “सगळ्यांनी सांगितलं आणि सगळं झालं, त्यामुळे ते केलं आणि पूर्ण झालं.”
T 4854 – everything said everything done .. so do the done and done the do .. pic.twitter.com/wYrAMetoGo
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 8, 2023
अमिताभ बच्चन कोणाला फाॅलो करतात?
अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्यांनी सुन ऐश्वर्याला अनफाॅलो केल्याच्या चर्चा आहेत. मात्र अमिताभ बच्चन इंस्टाग्रामवर 74 दिग्गज कलाकरांना फाॅलो करतात. यामध्ये ऐश्वर्याचा एक्स सलमान खानचा देखील समावेश आहे.
या सोबतच कतरिना कैफ, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, विराट कोल्ही, श्वेता बच्चन, नाव्या नंदा यांचा देखील समावेश आहे. मात्र, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला अनफाॅलो केल्यामुळे चर्चांना उधाण आलं.
ऐश्वर्या अभिषेकने घटस्फोटावर भाष्य केलं?
अनेकांना वाटलं की, खरोखरंच ऐश्वर्या राय ही बागेश्वर महाराजांच्या दरबारात गेली होती. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरंच घटस्फोट घेणार का?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य करण्यास तयार नाहीये.
News Title | Hence amitabh bachchan unfollow aishwarya rai
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA | भारताची ‘कसोटी’ संपली अन् ICC कडून खुशखबर; एका दगडात दोन पक्षी
सर्वात मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू
Mohammed Siraj आणि Jasprit Bumrah यांचा ‘ब्रो-मान्स’, ही दोस्ती तुटायची नाय!
‘कोण कोणामुळे निवडून आलंय…’, Ajit Pawar यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
Rohit Pawar | मोठी बातमी! बारामती ॲग्रोवर ईडीचा छापा; रोहित पवार अडचणीत






