काळजी घ्या! 6, 7 आणि 8 डिसेंबरला देशासह महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी

On: December 6, 2025 9:14 AM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतआहेत. कधी थंडी तर कधी अचानक पावसाची हजेरी अशी मिश्र स्थिती सध्या दिसत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.

सध्या महाराष्ट्रात गारठा काहीसा कमी झाला असून दुपारच्या वेळेत उष्णतेत वाढ होताना दिसते. तर देशातील काही राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले असून, अनेक ठिकाणी तब्बल मागील सर्व विक्रम मोडले आहेत. तामिळनाडू (Tamilnadu), आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये (Keral) सतत पाऊस सुरूच असून ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे राज्यातही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र डिसेंबर महिन्यात थंडीची लाट वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (Maharashtra Cold Wave)

6, 7 आणि 8 डिसेंबरला मुसळधार पावसाचा इशारा :

मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस अनुभवलेल्या हिमाचल प्रदेशात हवामान पुन्हा बदलले आहे. IMD ने 6, 7 आणि 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

त्याचप्रमाणे केरळमध्ये मान्सूनपासून आतापर्यंत सतत पाऊस सुरूच आहे. हवामानातील बदल लक्षात घेता पुढील 3 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update | भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा :

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, धुळे येथे 8.6 अंश तर पंजाबच्या (Punjab) अदमपूर येथे 2 अंश तापमान नोंदले गेले आहे. (Maharashtra Weather Update)

दरम्यान, हवामान खात्याने 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय बर्फवृष्टीची शक्यता देखील व्यक्त केली आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार पावसासह बर्फवृष्टीमुळे पुढील काही दिवसांत थंडीची लाट अधिक तीव्र होऊ शकते.

अशा प्रकारच्या हवामानातील अचानक बदलांमुळे आरोग्याच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

News title : Heavy rains on December 6, 7 and 8, direct high alert issued in these states

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now