पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

On: November 11, 2023 9:28 AM
---Advertisement---

मुंबई | राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस (Rain Update) सुरु आहे. पुढील 24 तासांत पुन्हा पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे.

दिवाळीच्या तयारीची लगबग सुरु असताना पुणे शहरात पाऊस झाला. पुणे शहरात आलेल्या पावसामुळे खरेदीला गेलेल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली.

मुंबईत 1 ऑक्टोरबर पासून ते 8 नोव्हेंबर म्हणजे सव्वा महिना प्रदूषण प्रचंड वाढलं होतं. परंतु नोव्हेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे मुंबईतील प्रदूषण कमी झालं. हवेची गुणवत्ता सुधारली. पावसामुळे 200 एक्यूआयवर गेलेली हवेची गुणवत्ता 94 एक्याआयवर खाली आली आहे.

अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाचा फटका शेतात काढणीला आलेल्या शेती पिकांना बसणार आहे.

मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ऑक्टोंबर हिटचा तडाखाही राज्याने अनुभवला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. वातावरण बदलाचा फटका देशातील अनेक भागाला आता बसला आहे.

देशात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये मध्यम पाऊस होणार आहे. तेलंगणा, अंदमान आणि निकोबार द्विप समूह, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप 

शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी मोठा बदल, ‘या’ मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री!

‘हा’ माजी मंत्री अडचणीत; राजकारणात खळबळ

येत्या 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now