घराबाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा

On: April 5, 2023 1:40 PM
---Advertisement---

सोलापूर | सोलापूर (Solapur) शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा पारा चाळीसजवळ पोहोचला आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाईलाई होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे.

सोलापूर (Solapur) शहरात दुपारी सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. रात्रीच्या वेळी सुटणारी थंडीही कमी झाली आहे. मंगळवारी सोलापूर (Solapur) शहरात 39.9 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मे महिन्यातील उन्हाच्या चटक्यांसारखे चटके एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच लोकांच्या अंगाला बसत आहेत. सोलापुरात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. हंगामातील सर्वोच्च तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे.

दरम्यान, किमान तापमान हे 22.4 एवढे नोंदवण्यात आलं आहे. वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर घामाघुम झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now