Heat wave | सध्या देशातील राज्यांमध्ये उन्हाने नको नको केलं आहे. जिकडे तिकडे उन्हाच्या झळांचा (Heat wave) सामना करावा लागत आहे. अधूनमधून अवकाळी पाऊस धिंगाणा घालत आहे. मात्र त्यामुळे देखील ग्रामीण भागात पिकांचं नुकसान होत आहे. तर मुंबई सारख्या शहरात होर्डिंग दुर्घटना घडली आहे. राज्यासह देशात उन्हाचा चटका कायम पाहायला मिळत आहे. आगामी दोन दिवसांमध्ये केरळला मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मात्र अशातच बिहार येथे उष्मघाताने (Heat wave) मोठी घटना घडली आहे.
भीषण गर्मीमुळे उष्मघाताने 50 हून अधिक विद्यार्थी बेशुद्ध
अशातच आता बिहारच्या शेखपुरा येथील जिल्ह्यात शाळेत उष्मघाताने (Heat wave) 50 हून अधिक विद्यार्थी बेशुद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थीनीची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिका वेळेवर आली नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
देशासह राज्यात उन्हाने नको केलं आहे. अशातच आता बिहारमध्ये देखील सूर्य आग ओकताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 45 डिग्रीच्या वर गेलंय. होरपळून टाकणाऱ्या या गर्मीमुळे राज्यातील शाळा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उष्मघाताने अरियरी प्रखंडच्या मनकौल मध्य विद्यालयात विद्यार्थीनीची शुद्ध हरपली आहे. (Heat wave)
#WATCH | Bihar: Several students fainted due to heatwave conditions at a school in Sheikhpura. The students were later admitted to a hospital. pic.twitter.com/Mv9Eg3taCJ
— ANI (@ANI) May 29, 2024
प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात तासाला उपस्थित होते. यावेळी इयत्ता 8 वीच्या वर्गातील इतर काही विद्यार्थीनी एका पाठोपाठ बेशुद्ध झाल्या, अशी माहिती शाळेचे हेड मास्टर सुरेश प्रसाद यांनी दिली. मुली बेशुद्ध कोसळल्यानंतर एकच पळापळ झाली. त्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हवा घालायला सुरूवात केली होती. इलेक्ट्रोलच पाणी दिलं. मुलांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिका मागवली.
डिहायड्रेशनची समस्या निर्माण झाली
सूचना करूनही रूग्णवाहिका आली नसल्याची माहिती समोर आली. मुलांना उपचारासाठी सदर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्ह्यात भीषण गर्मी आहे. त्यामुळे मुलांना डिहायड्रेशनची समस्या निर्माण झाली होती. मुलांवर उपचार सुरू झाले आहेत.
News Title – Heat wave More Than 50 Students Fainted Due To Extreme Heat In Sheikhpura Bihar
महत्त्वाच्या बातम्या
इटलीतील आलिशान क्रुझवर होणार अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा; पाहा PHOTO
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल
पुणे अपघात प्रकरणात ट्विस्ट; ‘मी शांत बसणार नाही, सगळी नावं..’, अटकेत असलेल्या डॉक्टरचा मोठा इशारा
“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल”, गौरी खानचं मोठं वक्तव्य
‘ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरच्या…’; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा






