हार्ट अटॅक येण्याच्या 30 दिवसांपूर्वी शरीर देतं ‘हे’ 5 मोठे संकेत, लगेच व्हा सावध अन्यथा…

On: March 13, 2025 8:34 AM
Heart Blockage Symptoms
---Advertisement---

Heart attack signs |  गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. एकेकाळी हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसत असे, मात्र आता तरुणांमध्येही हार्ट अटॅकची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. (Heart attack signs )

असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, तणाव आणि प्रदूषण ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात. हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही, तर त्याच्या 30 दिवस आधीपासून शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असते. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो.

छाती, खांद्यामध्ये आणि जबड्यात वेदना

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक रुग्णांना छातीत वेदना, जळजळ किंवा दडपण जाणवते. काही प्रकरणांमध्ये ही वेदना खांद्यापर्यंत, हातापर्यंत आणि जबड्यापर्यंत पोहोचू शकते. विशेषतः डावा खांदा आणि हात दुखत असल्यास हे हार्ट अटॅकचे गंभीर लक्षण मानले जाते. जर वारंवार अशा प्रकारच्या वेदना जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तीव्र थकवा आणि अशक्तपणा

कोणतेही मेहनतीचे काम न करताही जर सतत थकवा जाणवत असेल, शरीर अशक्त वाटत असेल तर हेही हृदयविकाराचा इशारा असू शकतो. शरीराला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास उर्जा कमी होते आणि थकवा वाढतो. अशा स्थितीत या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. (Heart attack signs )

चक्कर येणे आणि बेशुद्ध होणे

हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही आठवड्यांपासून चक्कर येणे, डोकं हलकं वाटणे किंवा अचानक बेशुद्ध होणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. हृदय रक्त योग्यप्रकारे पंप करू शकत नसेल, तर मेंदूला कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे चक्कर येते. या स्थितीत वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

श्वास घेण्यात अडथळा आणि धाप लागणे

हलका व्यायाम किंवा चालल्यानंतर लगेचच दम लागत असेल, श्वास घेण्यास अडथळा येत असेल, तर हेही हृदयाच्या आजाराचे मोठे लक्षण असू शकते. हृदय व्यवस्थित काम करत नसल्यास फुफ्फुसांमध्ये पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

WHO च्या अहवालानुसार, दरवर्षी सुमारे1.78 कोटी लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. आशियाई देशांमध्ये विशेषतः तरुण वयोगटात हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनियमित जीवनशैली, जंक फूड, मानसिक तणाव आणि व्यायामाचा अभाव ही यामागची प्रमुख कारणे आहेत. (Heart attack signs )

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा

संतुलित आहार घ्या – तळलेले, तेलकट पदार्थ टाळा. फळे, भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थ खा.
नियमित व्यायाम करा – दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा योगासने करा.
मानसिक तणाव कमी करा – ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा.
धूम्रपान व मद्यपान टाळा – हृदयाच्या आरोग्यासाठी हे अत्यंत घातक आहे.
नियमित आरोग्य तपासणी करा – कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर वेळोवेळी तपासा.

Title : Heart Attack Signs 5 Symptoms You Should Never Ignore

 

Join WhatsApp Group

Join Now