…तर उन्हामुळे होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

On: April 21, 2024 4:40 PM
health Update
---Advertisement---

Health Update | एप्रिल महिन्यातच अंगाची लाहीलाई होताना दिसत आहे. राज्यात उष्णतेचा पारा हा 40 अंशापर्यंत गेला आहे. अनेकांना उष्मघाताचा त्रास होऊ लागला आहे. हवामान अभ्यासक दुपारी बाहेर पडू नका, असं सांगत आहेत. जर फार महत्त्वाचं काम असेल तर उन्हापासून बचाव होईल असा पेहराव घालून घराबाहेर पडावं. दरम्यान, सध्या तापमानाने उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र अधिक उन्हामध्ये त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो, अशी माहिती समोर आलीये. (Health Update)

उन्हामुळे त्वचेचा कॅन्सर होतो

उन्हामुळे अनेकांना उष्मघाताचा त्रास होतो. बहुतांश लोक डिहायड्रेशनला बळी पडत आहे. याच दरम्यान रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर आलीये. याव्यतिरिक्त अधिक उन्हामुळे त्वचेचा कॅन्सर होतो, अशी माहिती आता समोर आलीये. (Health Update)

त्वचेच्या कॅन्सरला मेलेनोमा कॅन्सर असंही म्हणतात. शरीराच्या ज्या भागावर अधिक ऊन पडते त्याजागेवर त्वचेचा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते. कॅन्सर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडल्यास आपल्या त्वचेची काळजी घ्यावी. स्वत:ला शक्य तेवढं हायड्रेट ठेवावं. (Health Update)

सकाळी 7 ते 9 च्या सुमारास घराबाहेर पडा. कारण यावेळेत व्हिटॅमिन D मिळतं. सकाळी 9 नंतर सूर्यप्रकाश शरीरासाठी अधिक घातक असतो. जरी घराबाहेर पडला तरीही काळजीपूर्वक बाहेर पडा. तर दुपारी 11 ते 4 वाजेदरम्यान उन्हातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. (Health Update)

सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अल्ट्राव्हायोलेटमुळे स्किन कॅन्सरचा धोका होतो. ज्या लोकांची इम्युनिटी कमकुवत आहे. त्यांना त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. इतर देशांच्या तुलनेत भारतात स्किन कॅन्सरचा धोका खूप कमी आहे. मान आणि हातावर त्वचेचा कॅन्सर होतो.

त्वचेच्या कॅन्सरची काही लक्षणं

त्वचेच्या कॅन्सरची काही लक्षण समोर आली आहेत. त्वचेवर चामखिळ दिसली की ते स्किन कॅन्सरचं लक्षण आहे. त्वचेवर पांढरे डाग, जखमा, खाज आणि मानेवर लाल रंगाचा पॅच त्वचेवर काही बदल दिसू लागले की ते त्वचेच्या कॅन्सरचे लक्षण असू शकतं. यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

News Title – Health Update About Skin Cancer In Summer

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

Join WhatsApp Group

Join Now