Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

On: January 16, 2024 12:36 PM
amitabh bachchan
---Advertisement---

Amitabh Bachchan | बाॅलिवूडचे बिग बी आर्थातच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या अभिनयातून कलेची छाप सोडत प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आज देखील अमिताभ बच्चन यांची भूमीका असलेले चित्रपट लोक पाहतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आपल्या चाहत्यांसाठी अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी तसेच प्रोफेशनल लाईफबदल पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान, त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या तब्येतीबदल सांगितलंय.

कोणती पोस्ट शेअर केली?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. शिवाय अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये स्वतःची टीम त्यार केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक ब्लाॅगमध्ये माहिती शेअर केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

अमिताभ बच्चनने (Amitabh Bachchan) ब्लाॅगमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हाताला पट्टी लावलेली दिसत आहे. तर हाताला काळ्या रंगाची पट्टी का लावली? याचं कारण खुद्द अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हाताची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिली आहे. बिग बी यांच्या शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. पण आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे.

शस्त्रक्रियेनंतर जाहीरात शूट केली

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) साठी जाहिरात देखील शूट केली आहे. बिग बी यांनी अभिनेता अक्षय कुमार आणि सुर्या यांच्यासोहत जाहिरातीचं शुटिंग केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या लीगमध्ये अनेक सामने होतील. यामध्ये अनेक स्टार्सनी आपापल्या टीम बनवल्या आहेत, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे मुंबई टीमचे मालक आहेत. तर अक्षय कुमारची टीम श्रीनगर आहे. ही एक क्रिकेट स्पर्धा आहे.

News Title : health update about amitabh bachchan

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज

Woman Mental Health Tips l महिलांनी आताच व्हा सावध, ही लक्षणं असतील तर तुमची मानसिक स्थिती नाही बरोबर!

Reliance, TCS सह ‘या’ 5 शेअर्सची छप्परफाड कमाई, एका आठवड्यात कमावले तब्बल 2 लाख कोटी!

Inflation l अबब! 400 रुपयांमध्ये मिळतायेत फक्त 12 अंडी, अन् 250 रुपये किलो झाला कांदा

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now