Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

On: January 15, 2024 9:31 AM
Health Tips
---Advertisement---

Health Tips l हिवाळ्यात थंडी जास्त प्रमाणात असल्याने शरीरासाठी ऊर्जा जास्त लागते. अशावेळी पौष्टिक पदार्थ खाणे महत्वाचे मानले जाते. अशातच आज नवीन वर्षाचा पहिला संक्रांत हा सण आहे. या सणाला आपल्या देशात खूप महत्व आहे. हा सण थंडीत (Health Tips) येत असल्याने या सणाला मोठ्या व्यक्तींने तीळ गूळ वाटण्याची प्रथा आहे. मात्र हे तीळ गूळ देण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

Health Tips l तीळ-गूळ खाण्याचे फायदे :

तीळ आणि गुळापासून तयार केलेले लाडू हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. मकर संक्रांती आणि लोहरी या दिवशी तीळ आणि गुळाच्या लाडूंना विशेष महत्त्व आहे. तीळ आणि गुळात अनेक प्रकारचे पोषक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्यात तीळ आणि गुळाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते (Health Tips) :

थंडीमध्ये हृदयाच्या समस्या जास्त प्रमाणात वाढतात. यामागचे कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात न राहणे. तिळाचे लाडू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कायम राहते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकारक शक्ती :

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे. जस्त, लोह, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारखे पोषक तत्व तीळामध्ये आढळतात. तसेच गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड आणि लोह (Health Tips) यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो.

तिळाचे लाडू रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास खूप मदत करतात. जर तुम्हाला संसर्ग आणि रोगांपासून सुरक्षित राहायचे असेल,तर तुम्ही हिवाळ्यात तिळ गुळाचे लाडू खाणे महत्वाचे मानले जाते.

 मजबूत हाडे :

तिळाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. यासोबतच हे लाडू (Health Tips) हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यासोबतच हिवाळ्यात सांधेदुखी, गुडघेदुखी सारख्या आजरांपासून सुटका करतात.

दाहक-विरोधी गुणधर्म :

तिळाच्या लाडूमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. मुतखडा आजार असलेल्या लोकांसाठी तीळ गुळाचे लाडू उपयुक्त ठरतात. कारण त्यांना जळजळ होण्याची अधिक शक्यता असते.

महत्त्वाच्या बातम्या –

Cricket News: सचिन तेंडुलकर-युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!

Crossed Check l बँकेच्या चेकवर दोन रेषा का मारल्या जातात? जाणून घ्या RBI चा नियम काय सांगतो

Ram Mandir | राम मंदीर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Gold Rate Today l संक्रातीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

Makar Sankranti 2024: का साजरी केली जाते मकर संक्रांती? जाणून घ्या पूजेचा विधी आणि शूभ मुहूर्त

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now