नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?

On: May 11, 2024 10:55 AM
Health Insurance
---Advertisement---

Health Insurance l आजकाल नागरिक आरोग्य विमा खरेदी करण्यावर जास्त भर देतात. कारण अडचणीच्या काळात आरोग्य विमा कामी येतो. मात्र जर तुम्ही HDFC ERGO चा आरोग्य विमा घेतला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

HDFC ERGO ने घेतला मोठा निर्णय :

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँकेच्या मालकीची सामान्य विमा कंपनी HDFC ERGO ने आपल्या तीन विमा योजना या यादीतून काढून टाकल्या आहेत. जर तुम्ही ही आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही काय करावे? असा प्रश्न आता नागरिकांना पडला असेलच. तर आता आपण HDFC ERGO ने नेमक्या कोणत्या पॉलिसी बाद केल्या आहेत ते जाणून घेऊयात…

एचडीएफसी एजन्सींच्या मते, ज्या ग्राहकांची पॉलिसी 7 ऑगस्ट 2024 रोजी किंवा त्यानंतर नूतनीकरण होणार आहे, त्यांची इच्छा असल्यास ते कंपनीच्या नवीन प्लॅनमध्ये शिफ्ट होऊ शकतात. कंपनीच्या योजनेनुसार, ते पॉलिसीधारकांना Optima Secure आणि आरोग्य संजीवनी सारख्या पॉलिसींचा पर्याय देईल. लोक त्यांच्या सोयीनुसार नवीन योजना निवडू शकतात. जुन्या प्लॅनमध्ये येणारा बोनस नव्या प्लानमध्ये देखील शिफ्ट केला जाईल.

Health Insurance l कोणती पॉलिसी मागे घेतली? :

एचडीएफसी एर्गोने काढलेल्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये माय: हेल्थ सुरक्षा योजनांचे तीन वेगवेगळे प्रकार समाविष्ट केले आहेत. कंपनीने माय-हेल्थ सुरक्षा गोल्ड, माय-हेल्थ सुरक्षा प्लॅटिनम आणि माय-हेल्थ सुरक्षा सिल्व्हर योजना मागे घेतल्या आहेत. तसेच HDFC ERGO चे चार प्रकारच्या योजना बाजारात आहेत. तर कंपनीने चौथ्या प्रकारची कोटी सुरक्षा योजना सुरू ठेवली आहे.

जर तुमच्यापैकी काही नागरिकांकडे या तीन प्रकारच्या योजना असतील तर नेमकं काय कराल हवं? तर त्या पॉलिसी धारकांनी काळजी करण्याची गरज नाही. तुमची योजना पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या तारखेपर्यंत सक्रिय राहील. जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी त्याचे नूतनीकरण करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला त्यात बदल दिसेल. म्हणजे पॉलिसीधारकांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

News Title – HDFC ERGO General Insurance

महत्त्वाच्या बातम्या

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

माझे मोदी सरकारबद्दल मतभेद राहणार! पण तरीदेखील महायुतीला मतदान करा; राज ठाकरे

शनीच्या कृपेने 24 तासांत हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now