HDFC बँकेने लाखो ग्राहकांना दिला सर्वात मोठा झटका!

On: June 11, 2025 10:03 AM
HDFC Bank MCLR
---Advertisement---

HDFC Bank | गुंतवणूकदारांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने आपल्या मुदतठेवी (एफडी) आणि बचत खात्यावरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि बचत खाती असलेल्या लाखो ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांकडून व्याजदरात बदल केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर HDFC बँकेने विविध कालावधीसाठी एफडीवरील व्याजदर कमी करत 3% ते 7.20% दरम्यान आणले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये नेहमीप्रमाणे 0.50% अधिक व्याज मिळणार आहे.

एफडीसाठी नवीन व्याजदर काय असतील? :

7 ते 14 दिवस – सामान्य खातेदार: 2.75%, ज्येष्ठ नागरिक: 3.25%

30 ते 45 दिवस – सामान्य खातेदार: 3.25%, ज्येष्ठ नागरिक: 3.75%

90 दिवस ते 6 महिने – सामान्य: 4.25%, ज्येष्ठ: 4.75%

18 महिने ते 21 महिने – सामान्य: 6.60%, ज्येष्ठ: 7.10%

याशिवाय, इतर कालावधींसाठी देखील व्याजदरात लक्षणीय कपात झाली असून, बँकेच्या संकेतस्थळावर याचे संपूर्ण अपडेट उपलब्ध आहे.

HDFC Bank | सेव्हिंग अकाउंट व्याजदरातही कपात :

बँकेने बचत खात्यांवर व्याजदरातही कपात केली असून 50 लाखांपेक्षा जास्त बॅलन्सवर व्याजदर 3.50% वरून 3.00% केला गेला आहे. तसेच 50 लाखांपेक्षा कमी बॅलन्स असणाऱ्यांसाठी व्याजदर 3.00% कायम ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, जरी ठेवीदारांसाठी ही बातमी नकारात्मक असली तरी कर्जदारांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. कारण HDFC बँकेने आपल्या MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) दर 0.10% ने कमी केले आहेत:

1 दिवस व 1 महिना – 8.90%

3 महिने – 8.95%

6 महिने व 1 वर्ष – 9.05%

2 वर्षे व 3 वर्षे – 9.10%

या कपातीमुळे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जांचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

News Title: HDFC Bank Slashes FD and Savings Account Interest Rates, Major Setback for Depositors

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now