HDFC ने ग्राहकांना दिली मोठी गुड न्यूज; दिवाळीआधी बँकेने घेतला मोठा निर्णय

On: October 8, 2025 4:38 PM
HDFC Bank MCLR
---Advertisement---

HDFC Bank Loan | यंदा ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आली आहे आणि सण म्हंटल्यावर खर्च आणि खरेदी आलीच. दरम्यानच सर्वात मोठी बँक HDFC च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकने दिवाळीपूर्वी कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली जाणार असल्याचे सांगितले आहे. बँकेने विविध कालावधीच्या MCLR मध्ये थेट ०.१५ टक्क्याची कपात केली आहे. त्यामुळे आता कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे सर्व बदल ७ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहेत.

बँकने घेतलेल्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना मोठी मदत होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास २५,७३,४५० रुपयांचे कर्ज २०२५ मध्ये एचडीएफसी बँकने दिले आहे. यावरून लक्षात येते कि, कितीतरी ग्राहकांना या निर्णयामुळे लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे.

काय आहेत नवीन दर? :

तुम्ही जर एचडीएफसी बँक मधून लोन घेतले असेल किंव्हा घेण्याच्या विचारात असाल, तर किती टक्क्यांनी MCLR ची कपात झाली आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बँकेने ओव्हरनाईटपासून तीन वर्षांपर्यंत असलेल्या विविध मुदतींसाठी एमसीएलआर घटवले आहे. ०.०५ ते ०.१५ पर्यंत हि कपात केली गेली आहे. ओव्हरनाईट एमसीएलआर दर ८.५५ पासून ८.४५ टक्क्यांवर आला आहे. तीन महिन्याचा एमसीएलआर दार ८.६० पासून कमी होऊन ८.४५ एवढा झाला आहे.

नवीन कपात केलेल्या व्याजदरामुळे आता घर लोन, कार लोन तसेच वैयक्तिक लोन घेतलेल्या किंव्हा घेण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांना मासिक हफ्ता म्हणजेच EMI किंवा कर्जाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

HDFC Bank Loan | काय आहे एमसीएलआर? :

एमसीएलआर म्हणजे बँकेकडून दिले जाणारे सर्वात कमी व्याजदर. कुठलीही बँक एमसीएलआरच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीने व्याजदर देऊ शकत नाही. जेव्हा एमसीएलआर मध्ये कपात केली जाते, तेव्हा आपोआपच कर्जाचे व्याजदरही कमी होते.

प्रत्येक बँकेला आपले स्वतंत्र एमसीएलआर ठरवता येते. एमसीएलआर बदलल्यास त्याचा मोठा परिणाम फ्लोटिंग दारांशी संबंधित कर्जसाठी होतो. एमसीएलआर वाढल्यास व्याजदर वाढतो आणि कमी झाल्यास व्याजदर कमी होतो.

एमसीएलआर कसा ठरवलं जातो? :

प्रत्येक बँक आपल्या एमसीएलआरची किंमत स्वतः ठरवत असते. एमसीएलआर बँकांच्या ठेवींवरील व्याजदर, रिसेर्व बँकचा रेपो रेट, बँकेच्या कामकाजाचा खर्च आणि सीआरआर म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो अशा घटकांवर अवलंबून असतो.

बँक या सर्व गोष्टींना विचारात घेऊनच एमसीएलआर ठरवते. RBI कडून जेव्हा रेपो रेट बदलला जातो तेव्हा एमसीएलआरमध्ये देखील बदल होतो. एचडीएफसी बँकने कमी केलेल्या एमसीएलआरमुळे ग्राहकांना मोठी आर्थिक मदत होणार असून, ही बातमी त्यांच्यासाठी दिलासाजनक ठरणार आहे.

News Title- Good News For HDFC Customer

Join WhatsApp Group

Join Now