HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका!

On: March 30, 2024 11:31 AM
HDFC Bank
---Advertisement---

HDFC Bank Home Loan Interest Rate l खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बँकेने ग्राहकांना गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. HDFC बँकेने त्यांच्या रेपो-लिंक्ड होम लोनवरील व्याजदरात 10-15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्जाचे दर 8.70 ते 9.8 टक्क्यांपर्यंत आले आहेत.

बँकेने FAQ केले जारी :

बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरणामुळे गृहकर्ज दरांमध्ये हा बदल झाला आहे आणि आता तो रिटेल प्राइम लेंडिंग रेटशी (आरपीएलआर) जोडला जाणार नाही.

बँकेने जारी केलेल्या FAQ नुसार, तुमच्या खात्यावर लागू होणारा व्याजदर आता रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) ऐवजी EBLR शी जोडला जाणार आहे. हे फ्लोटिंग व्याजदरांवरील नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. विलीनीकरणानंतर ROI मध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय भविष्यातील कोणतेही बदल EBLR वर आधारित असणार आहे. नवीन रेपो लिंक्ड व्याजदर नवीन ग्राहकांना लागू असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. तसेच जुने ग्राहक RPLR देखील सुरू ठेवू शकतात.

HDFC Bank Home Loan Interest Rate l रेपो दर काय आहेत? :

बाह्य बेंचमार्क कर्ज दर RBI रेपो दराशी जोडलेले आहेत. सध्याचा रेपो दर 6.50 टक्के आहे. रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) व्यावसायिक बँकांना कर्ज देते. या आधारावर कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय ठरवला जातो.

इतर बँकांमध्ये गृहकर्जाचे दर काय आहेत? :

ICICI बँकेतील गृहकर्जाचे दर 9 टक्के ते 10.05 टक्के दरम्यान आहेत. SBI चे गृहकर्ज दर 9.15 टक्के ते कमाल 10.05 टक्के आहेत. दुसरीकडे ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.75 ते 9.65 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. त्याचवेळी कोटक महिंद्रा बँक ग्राहकांना 8.70 टक्के दराने कर्ज देत आहे.

News Title : HDFC Bank Home Loan Interest Rate

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर विराट- गौतमचे झाले पॅच अप! मिठी मारून दिल्लीकरांची मने जिंकली

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

तूळ राशीसह या 3 राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

कोरोना काळात ताट, वाट्या, थाळ्या का वाजवायला लावल्या?, मोदींचा सर्वात मोठा खुलासा

बॅालिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत कंगनाने केली स्वतःची बरोबरी!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now