हार्दिक पांड्याची राजकारणात एन्ट्री?, अमित शहांसोबतचा फोटो व्हायरल

On: February 14, 2024 2:19 PM
Hardeek pandya
---Advertisement---

Hardeek Pandya | टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardeek Pandya) हा नेहमीच कोणत्यानं कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी त्याची निवड झाली आहे. तेव्हापासून हार्दिक पांड्याची अधिक चर्चा होताना दिसत आहे. मात्र आता तो एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत तो एका क्रिकेट मैदानावर दिसला असून आता तो राजकारणात एन्ट्री करणार का?, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

वनडे विश्वचषक पार पडल्यानंतर हार्दिक पांड्या (Hardeek Pandya) क्रिकेटपासून दूर झाला की काय असा सवास उपस्थित होत होता. मात्र विश्वचषकावेळी हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आता काही महिने क्रिकेटपासून लांब आहे. अशातच अमित शहा यांच्यासोबत हार्दिक पांड्याचा फोटो व्हायरल होतोय यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आता याचं खरं कारण समोर आलं आहे.

हार्दिक पांड्या अमित शहांसोबत मैदानावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशामध्ये संसदीय क्रीडा होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर गांधीनगर लोकसभा प्रीमियर लीग आहे. यामुळे अमित शहा यांच्यासोबत हार्दिक पांड्याने आपली उपस्थिती दर्शवली आहे. एकूण 7 संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार असून हार्दिक पांड्या आणि अमित शहा यांच्या हस्ते या लीगचे उद्घाटन करण्यात आलं आहे.


हार्दिक पांड्या हा 2023 मध्ये बांग्लादेशविरुद्ध दुखापतग्रस्त होता. त्यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून लांब आहे. तसेच त्यानंतर त्याने आपल्या नेटप्रॅक्टिसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

आयपीएलमुळे पांड्या चर्चेत

आगामी होणाऱ्या 2024 आयपीएलमुळे तो अधिक चर्चेत आहे. त्याला ट्रेंड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश दिला. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्स संघाच्या संघमालकाने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधारपदाची संधी दिल्याने रोहित शर्माचे चाहते नाराज आहेत.

हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली 2309 धावा असून त्याने आयपीएलमध्ये  53 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 3500 हून अधिक धावा आहेत. 150 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

News Title – Hardik pandya with Amit shah viral photo

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन

‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा!

‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; अशोक चव्हाणांनी स्वत:च सांगितलं कारण

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर

Join WhatsApp Group

Join Now