आम्ही स्वतःला सुरुवातीलाच अडचणीत आणलं!, हार्दिकनं पराभवाचं खापर फोडलं रोहित शर्मावर!

On: April 23, 2024 3:12 PM
IPL 2024
---Advertisement---

Hardik Pandya | राजस्थान रॉयल्सविरुद्ध वानखेडे मैदानावर झालेल्या कालच्या (22 एप्रिल) सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झाला. सांघिक कामगिरी करण्यात सर्वच अपयशी ठरले. त्यात गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास अत्यंत साधारण खेळ खेळाडूंनी केला. मुंबईने हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. संघ पॉइंट टेबलमध्ये 6 गुणांसह 7 व्या स्थानी आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईचा फॉर्म म्हणावा तेवढा चांगला नाहीये.

कालच्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) आपल्या संघाच्या त्रुटी सांगितल्या.तसंच पराभवाचं खापर त्याने थेट रोहित शर्मावर फोडलं. राजस्थानने मुंबईला या लीगमध्ये दोनवेळा हरवलं आहे. कालच्या सामन्यात संदीप शर्माने घेतलेल्या 5 विकेट्सनंतर यशस्वीचे शतक राजस्थानच्या विजयात महत्त्वाचे ठरले.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya ) प्रतिक्रिया देताना म्हटलं की ,आम्ही स्वतःला सुरुवातीलाच अडचणीत आणले. पण तिलक आणि नेहल यांनी दमदार फलंदाजी केली. आम्ही शेवट चांगला करू शकलो नाही आणि त्यामुळेच आम्हाला 10 ते 15 धावा कमी पडल्या. आम्हाला स्टम्पवर मारा करायला हवा होता, पॉवर प्लेमध्येच आम्ही बऱ्याच धावा दिल्या. असं हार्दिक म्हणाला. त्याने अप्रत्यक्ष ओपनर बॅट्समनवर निशाणा साधला. मुंबईकडून रोहित शर्मा ओपनिंग करत असतो.

तसंच पुढे बोलताना तो म्हणाला की, क्षेत्ररक्षणात आमचा दिवस नव्हता. प्रत्येकाला त्यांची जबाबदारी माहीत आहे, त्यामुळे या चुका सुधारायला हव्या आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मला संघात सतत बदल करणे आवडत नाही, मला खेळाडूंच्या पाठीशी राहायला आवडते. चांगलं क्रिकेट खेळणं हेच आमचं लक्ष्य आहे.

मुंबईचा राजस्थानकडून दारुण पराभव

दरम्यान, मुंबईने राजस्थानला विजयासाठी 180 धावांचं लक्ष दिलं. मुंबई इंडियन्स संघाने सुरूवातीला 20 षटकांत 9 बाद 179 धावा केल्या. राजस्थानने हे लक्ष 18.4 षटकांत 1 बाद 183 धावा करत पार केले. राजस्थानकडून यशस्वी आणि जॉस बटलरने 74 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन आणि यशस्वीने 65 चेंडूंत नाबाद 109 धावांची भागीदारी केली.

जॉसच्या विकेटनंतर मुंबईला दुसरी विकेट घेता आली नाही. यशस्वी व कर्णधार संजू सॅमसन यांचे सोपे झेल अनुक्रमे नेहाल व टीम डेव्हिड यांनी टाकले. राजस्थानने 9 विकेट्सने हा सामना जिंकून गुणतालिकेत 8 सामन्यांत 7 विजयासह 14 गुणांसोबत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली.

News Title : Hardik Pandya reaction after losing the match against Rajasthan Royals

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव उतरले, आता ‘असे’ आहेत दर

सोलापुरात भाजपला आणखी एक धक्का, फडणवीसांच्या विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली!

वंचित बहुजन आघाडीने वाढवलं भाजपचं टेन्शन, ‘या’ मतदारसंघात पराभव होणार?

राजस्थानकडून पराभव झाल्यावर हार्दिकनं सांगितली ‘ही’ कारणं, चेहऱ्यावर हसू मात्र कायम!

“आम्ही बापाच्या 2 नंबरच्या पैशावर…”; भाजप महिला पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये वादाचा भडका

Join WhatsApp Group

Join Now