मैदानातच हार्दिक पांड्याचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स! T20 World Cup जिंकताच सर्वांसमोर केलं असं काही… पाहा Video

On: March 9, 2026 2:21 PM
Hardik Pandya mahika sharma
---Advertisement---

 T20 World Cup 2026| आयसीसी टी20 विश्वचषक Final मध्ये Team India ने दमदार कामगिरी करत New Zealand ला पराभूत करून इतिहास रचला. या थरारक सामन्यात भारताने सलग दुसऱ्यांदा T20 World Cup trophy जिंकत जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले. अंतिम विजयानंतर मैदानावर भारतीय खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळाला, पण सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा (Mahika Sharma) ची. सामना जिंकल्यानंतर सेलीब्रेशन करताना दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हार्दिक पांड्या माहिका शर्मा व्हिडीओ

T20 World Cup 2026 विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा उत्साह गगनाला भिडला होता. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका शर्मा देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. संपूर्ण T20 World Cup स्पर्धेत ती हार्दिकला चीअर करताना दिसली होती. सामना संपताच ती थेट मैदानावर आली. दोघांनी मिठी मारतानाचा आणि डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

या ऐतिहासिक विजयानंतर या कपलचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांची मने जिंकत असून हा Celebration मोमेंट इंटरनेटवर वेगाने शेअर होत आहे. विजयानंतर हार्दिकने माहिका शर्मा आपल्या आयुष्यात “lucky charm” असल्याचेही सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

या मॅचमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. त्याने T20 World Cup 2026 मध्ये 217 runs करत दोन अर्धशतके झळकावली, तर गोलंदाजीमध्ये 9 wickets घेत टीमला महत्त्वाचे यश मिळवून दिले. अंतिम सामन्यात त्याने 18 धावा केल्या असल्या तरी त्याची ऑलराउंड कामगिरी भारताच्या विजयानंतर महत्त्वाची ठरली.

हार्दिकचा जिगरी मित्र इशान किशन (Ishan Kishan) आणि त्याची गर्लफ्रेंड Aditi Hundia देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. विजयाच्या आनंदात भान हरपलेल्या हार्दिक आणि इशानने चक्क मैदानावरच गुजराती स्टाईलमध्ये ‘गरबा’ खेळायला सुरुवात केली. टीम इंडियाचा हा विजय केवळ मैदानावरच नाही तर इंटरनेटवरही सुपरहिट ठरला आहे. हार्दिक-माहिकाचा डान्स आणि इशान-हार्दिकचा गरबा सध्या सोशल मीडियावर टॉप Trending मध्ये आहेत.

Join WhatsApp Group

Join Now