हार्दिक पंड्या विरोधात तक्रार? पुण्यात मोठा राडा, ‘त्या’ घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

On: March 12, 2026 2:04 PM
Hardik Pandya
---Advertisement---

Hardik Pandya Controversy | टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर टीम इंडियामध्ये जल्लोषाचे वातावरण असतानाच स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विजयानंतरच्या सेलिब्रेशनदरम्यान राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी पुण्यात तक्रार दाखल झाली आहे.

पुण्यात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल :

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवत इतिहास रचला. अंतिम सामना जिंकल्यानंतर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे खेळाडूंनी मोठ्या उत्साहात विजयाचा जल्लोष केला. मात्र या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पंड्याने राष्ट्रध्वजाचा अयोग्य वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन (Shivajinagar Police Station) येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

ही तक्रार अ‍ॅडव्होकेट वाजिद खान (Wajid Khan) यांनी दिली आहे. तक्रारीनुसार, विश्वचषक जिंकल्यानंतर मैदानावर आनंद साजरा करताना हार्दिक पंड्याने तिरंगा आपल्या शरीराभोवती गुंडाळला आणि काही अनुचित हावभाव केले. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत या कृतीला कायद्याने गुन्हा मानले जावे, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. पोलिसांनीही ही तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे.

Hardik Pandya Controversy | मैदानावर उत्कृष्ट कामगिरी, बाहेर वाद :

एकीकडे हा वाद निर्माण झाला असला तरी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये हार्दिक पंड्याची कामगिरी अत्यंत प्रभावी ठरली. त्याने फलंदाजीत दोन अर्धशतकांसह महत्त्वपूर्ण धावा केल्या आणि गोलंदाजीतही 9 बळी घेत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. या शानदार प्रदर्शनामुळे आयसीसीच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये निवड झालेल्या चार भारतीय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला आहे.

विजयानंतर बोलताना हार्दिकने आपल्या वैयक्तिक संघर्षाचाही उल्लेख केला. त्याने सांगितले की 2024 च्या वर्ल्ड कपपूर्वी त्याला दुखापती आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र भारतासाठी पुन्हा दमदार पुनरागमन करून ट्रॉफी जिंकण्याचा निर्धार त्याने केला होता. भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला असला तरी हार्दिक पंड्यावर झालेल्या या आरोपामुळे क्रीडा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

News Title: Hardik Pandya Faces Flag Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now