Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा सिक्का निघाला खोटा!, रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करणार?

On: December 23, 2023 4:26 PM
IPL 2024
---Advertisement---

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सने भारताचा खेळाडू हार्दिक पांड्यावर लावलेला डाव त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनूसार हार्दिक पांड्या यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळण्याची शक्यता नाही. हार्दिक पांड्याबद्दल आलेली ही बातमी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) मॅनेजमेंटची झोप उडवणारी ठरली आहे. कारण मुंबईने नुकतंच रोहित शर्माला बाजूला सारुन हार्दिकच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकली होती, मात्र आता रोहित शर्माच (Rohit Sharma) पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्याची शक्यता आहे.

नेमकी काय बातमी आली समोर?

पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात बातमी दिली आहे. आयसीसी वर्ल्डकपदरम्यान हार्दिकच्या (Hardik Pandya) टाचेला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे, मात्र त्याच्या फिटनेबद्दल अद्याप कुठलीही अपडेट समोर आलेली नाही, त्यामुळे त्याच्या आयपीएल खेळण्याच्या शक्यतेवर फार मोठं प्रश्नचिन्ह असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेली माहिती खरी असेल तर हार्दिक पांड्या यंदाच्या आयपीएल हंगामाला मुकू शकतो, तसेच आयपीएलच्या पूर्वी भारताची (Team Inda) अफगानिस्तानसोबत टी-२० सामन्यांची (INDvsAFG) मालिका सुद्धा आहे, या मालिकेतही हार्दिक खेळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई इंडियन्सचा सिक्का निघाला खोटा-

यंदाच्या आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. हार्दिक गुजरात संघाचा (Gujrat Titans) कर्णधार होता, त्यामुळे यासंदर्भात गुजरात संघासोबत चर्चा करावी लागली, हार्दिकसोबत सुद्धा चर्चा करावी लागली. दोन्हींचा होकार आल्यानंतर हार्दिकच्या ट्रेडला मान्यता देण्यात आली.

आयपीएलपूर्वी घडलेली ही सर्वात मोठी घडामोड होती, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईने गुजरातसोबत केलेल्या ट्रेडअंतर्गत 15 कोटी रुपयांना विकत घेतलं, याशिवाय हस्तांतरण शुल्क देखील देण्यात आलं ज्याचे आकडे समोर आले नाही.

धक्कादायक बाब म्हणजे हार्दिक पांड्याला संघात घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) त्याच्या पदावरुन हटवलं आणि हार्दिक पांड्याला कर्णधार केलं, हा निर्णय सर्वांना धक्का देणारा ठरला. मुंबईच्या चाहत्यांनी या निर्णय़ाला जोरदार विरोध केला, मात्र मुंबईने आपला हा निर्णय रेटून नेला. आता मात्र मुंबईचा हा निर्णय मुंबईच्याच अंगलट येत असल्याचं दिसत आहे.

News Title: Hardik pandya can ruled out from ipl 2024

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Update | राज्यात थंडीचा मुक्काम आणखी वाढणार!, महत्त्वाची माहिती आली समोर

Pune-PCMC News | मनस्ताप नको असेल तर आत्ताच वाचा!, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठा बदल

Aishwarya Rai | ‘या’ कारणामुळे ऐश्वर्या झाली भावुक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Pune News | पुढील 48 तासात… पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागांना थंडीबाबत महत्त्वाचा इशारा

Pune News | मध्यरात्री सुद्धा मिळणार दारु, 24 तारखेपासून ‘या’ वेळेपर्यंत सुरु राहणार दुकानं!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now