पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

On: March 16, 2024 6:06 PM
Petrol Diesel Price
---Advertisement---

Petrol Diesel Price | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात केली आहे. नवीन किमती शुक्रवार 15 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता या दरात अजून घट होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Minister Hardeep Singh Puri) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मार्केटमधील परिस्थिती बघून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यासंदर्भात निर्णय घेतील असं हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी कमी होणार? :

गेल्या काही दिवसांमध्ये तेल कंपन्यांना तब्बल 69 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तर संपूर्ण वर्षभरात कंपन्यांना 85 ते 90 हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याचं मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं आहे. तसेच चौथ्या तिमाहीत कंपन्याचा नफा 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

त्यामुळे आगामी दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने कालच किमती कमी करून काही प्रमाणात दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजीच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. किमतीतील कपातीमुळे सुमारे 33 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे.

पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत :

आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) कमी करून सर्वसामन्यांना गिफ्ट दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने अनेक फायदे होणार आहेत. यामुळे लोकांच्या खर्चावर नियंत्रण राहण्यास मदत होईल. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अजून घट होण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले आहेत.

सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती किती? :

मुंबई : पेट्रोल 104.2 रुपये प्रती लीटर तर डिझेल 92.15 रुपये आहे.
कोलकाता : पेट्रोल 103.94 रुपये प्रती लीटर तर डिझेल 90.76 रुपये आहे.
चेन्नई : पेट्रोल 100.75 रुपये प्रती लीटर तर डिझेल 92.34 रुपये आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल 94.72 रुपये प्रती लीटर तर डिझेल 83.62 रुपये झाले आहे.

News Title: Hardeep Singh Puri predicts the possibility of a decrease in Petrol Diesel Price 

महत्त्वाच्या बातम्या-

आचारसंहिता म्हणजे काय? या दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते

तरुणांसाठी खुशखबर; सेबीमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करण्याचं स्वप्न होणार साकार; जबरदस्त फीचर्ससह CNG कार बाजारात येणार

उद्या DC Vs RCB मध्ये रंगणार महाअंतिम सामना? कोण वरचढ ठरणार

श्रेयंका पाटील आरसीबीसाठी ठरली गेम चेंजर; मुंबईच्या पराभवामागे हे ठरले मोठे कारण

Join WhatsApp Group

Join Now