बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा तो साउथ सिनेमा आता या दिवशी OTT वर येतोय?

On: March 14, 2024 12:02 PM
Hanuman OTT Release Date
---Advertisement---

Hanuman OTT Release Date l ‘हनुमान’ हा चित्रपट 12 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रशांत वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत दिसली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. अशातच आता हनुमान हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Hanuman OTT Release Date l ‘हनुमान’ चित्रपट या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता! :

गेल्या काही दिवसांपासून हनुमान चित्रपट हा 8 मार्चपासून ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु तसे झाले नाही. आता पुन्हा एकदा हनुमान चित्रपट नवीन रिलीज डेटसह चर्चेत आला आहे. 11 मार्च रोजी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ट्विट करून हनुमानाच्या ओटीटी स्ट्रीमिंगची तारीख लवकरच घोषित केली जाईल असे सांगितले होते.

मात्र आता हनुमान चित्रपट 16 मार्चला ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे यासंदर्भात माहिती दिली नाही. दक्षिण भाषांमधला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होईल आणि त्याचे हिंदी व्हर्जन Jio सिनेमावर स्ट्रीम केले जाईल असेही सांगितले जात आहे.

Hanuman OTT Release Date l हनुमान चित्रपटाने किती कमाई केली? :

हनुमान हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा सिनेमा बनवण्यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च आला होता, पण त्याच्या कमाईने या पिक्चरने बॉक्स ऑफिसला हादरवले आहे. या चित्रपटाने जगभरात 330 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र, पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी त्याचा दुसरा भागही जाहीर केला आहे. ‘हनुमान’ रिलीज झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी, निर्मात्यांनी घोषणा केली होती की या चित्रपटाचा एक सिक्वेल देखील येणार आहे, ज्याचे शीर्षक ‘जय हनुमान’ असणार आहे.

News Title : Hanuman OTT Release Date

महत्त्वाच्या बातम्या- 

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!

होळीपूर्वी हे शुभ कार्य करणे टाळा अन्यथा घडेल अशुभ घटना

भाजपने मुलाला आधीच दिला होता आदेश, आता बापाचा पत्ता केला कट!

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now