तारक मेहताच्या सोढीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर, बेपत्ता होण्याच्या आधी….

On: April 27, 2024 3:14 PM
Gurucharan Singh Aka Roshan Singh Sodhi missing
---Advertisement---

Gurucharan Singh | सोनी सबवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत ज्या अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं तो अभिनेता गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग अचानक गायब झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आता त्याचा शोध घेण्यात येत आहे. गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

‘सोढी’बद्दल हैराण करणारी माहिती समोर

आता नुकतीच गुरुचरण सिंगबद्दल(Gurucharan Singh)  एक मोठी माहिती मिळाली आहे. ज्यानंतर सर्वांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. गुरुचरण सिंगच्या मित्राने एक महत्वाची माहिती दिली आहे. तो म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून गुरुचरणची तब्येत खराब होती. दिल्लीला जाण्यापूर्वी त्याचा बीपी जास्त होता आणि त्याने काही तपासण्या देखील केल्या होत्या. तो नीट जेवलाही नव्हता. या वृत्तामुळे गुरुचरण सिंगबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे.

या घटनेबद्दल मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीला विचारण्यात आले असता ती म्हणाली की, आम्ही जूननंतर संपर्कात नाहीये. तो बेपत्ता झाल्याचे ऐकल्यापासून मला मोठा धक्काच बसला. त्याने सुरक्षित घरी यावं. दरम्यान, जेनिफर मिस्त्री हिने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप करत मालिका सोडली आहे.

सोढीची शेवटची पोस्ट

22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी गुरुचरण सिंग घरातून निघाला होता. मात्र, तो मुंबईला पोहोचलाच नाही.तसंच दिल्लीतील आपल्या घरीदेखील तो आला नाही. विमानतळावर अधिक माहिती घेतली असता गुरुचरण सिंह विमानात बसलाच नसल्याची माहिती समोर आली आहे.

बेपत्ता होण्याच्या 4 दिवसांपूर्वीच गुरुचरण सिंग याने वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडियावर त्याने याचा व्हिडीओ देखील टाकला होता. अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वडिलांसोबत खास व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आता अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.गुरुचरण सिंगचे (Gurucharan Singh) वृद्ध आई-वडील सातत्याने त्याचा शोध घेत होते. मात्र, अखेर त्यांनी आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार पोलिसांत दिली.

News Title – Gurucharan Singh Aka Roshan Singh Sodhi missing

Join WhatsApp Group

Join Now