Ram Mandir | मी पण राम मंदिराच्या आंदोलनात होतो, त्यामुळे मलाही…- गुणरत्न सदावर्ते

On: January 21, 2024 6:14 PM
Gunratna Sadavarte
---Advertisement---

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळत. पंतप्रधान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार असून ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेही असतील. या कार्यक्रमाला 7,000 हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. ज्यात राजकारणी, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, आघाडीचे उद्योगपती आणि इतरांचा समावेश आहे. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केलंय. तसेच सोहळ्याचं निमंत्रण मलाही आलं आहे, असं सदावर्तेंनी सांगितलं आहे.

राम मंदिराच्या (Ram Mandir) आंदोलनात मी पण होतो. त्यामुळे या सोहळ्याचं निमंत्रण मलाही आलं आहे. परंतु जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईत येणार आहेत, त्या संदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे मला अयोध्येला जाता येणार नाही. असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय.

राम मंदिराच्या आंदोलनात मी आणि जयश्री पाटील होतो. कारसेवकांची बाजू घेतली त्यामुळे कोर्टाने 22 तारखेला सुट्टी रद्द करण्याची याचिका करण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली, असं देखील सदावर्तेंनी म्हटलं.

मनोज जरांगे पाटील यांची पायी दींडी ही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालीये. पण मराठा आंदोलनाला विरोध करणारी याचिका जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. तसेच जरांगे पाटील हे मुंबईत सुरु करणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात देखील उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यासंदर्भात देखील सर्व मुद्दे उपस्थित केले जातील, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईत लाखो मराठा आंदोलकांसह पोहोचणार आहेत. मात्र त्याआधीच जरांगे यांना सदावर्ते कोर्टात खेचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune News | अजित पवारांना होम पीचवरच धक्क्यावर धक्के, आता…

Manoj Jarange | मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विनंती, म्हणाले…

Nails Eating Habits | …म्हणून लोक नखं खातात; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Shoaib Malik च्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया देत सानिया मिर्झाने केला मोठा गौप्यस्फोट!

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना म्हणाले ‘मूर्ख’; ‘त्या’ फोटोवरून नवा वाद

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now