Ram Mandir Pran Pratishtha | “छत्रपती शिवाजी महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा आहे”

On: January 22, 2024 3:51 PM
Ram Mandir Pran Pratishtha
---Advertisement---

Ram Mandir Pran Pratishtha | अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा (Ram Mandir Pran Pratishtha) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. यानंतर मोदींनी आणि प्रमुख मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली.

गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना

पंतप्रधानांच्या तपश्चर्येचं कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. आम्ही तुम्हाला 3 दिवस जमीनीवर झोपण्यास सांगितलं होतं. तुम्ही या थंडीत 11 दिवसांपासून जमीनीवर झोपत आहात. मित्रांनो ब्रम्हाजीने सृष्टीला निर्माण केलं तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता. तो भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा शब्द आहे. तप तप इती, असं त्यांनी सांगितलं.

Ram Mandir Pran Pratishtha | “महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा आहे”

आमच्या गुरुंचे गुरु परगुरु कांचीचे परमाचार्यजी महाराज करायचे तपश्चर. आज तपाची कमी होत आहे. आम्ही आज तो तप तुमच्यात पाहिला. ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो ज्यामध्ये हे सारं काही होतं. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.

लोकांना कदाचित ठाऊक नाही. जेव्हा ते मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी श्री शैलमवर गेले तेव्हा 3 दिवसांचा उपवास केला. 3 दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी म्हटलं, मला राज्य नाही करायचं. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शीवाच्या तपश्चर्येसाठी जन्मलो आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत नेऊ नका. त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं आणि परत घेऊन आले की हे सुद्धा तुमचं कार्य आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

गोविंदगिरी महाराजांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं की निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी आपल्याला आज एक श्रीमंत योगी प्राप्त झाला, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.

मी स्वत:ला श्रद्धेच्या बाबतीत कधी भावूक होत नाही. मात्र काही ठिकाणं अशी असतात की आपोआप आपण नतमस्तक होतो, असंही गोविंदगिरी महाराजांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Atal Setu Accident | मुंबईतील ‘अटल सेतू’ वर पहिला खतरनाक अपघात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Ram Mandir Pran Pratishtha | आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंंदिरात राहतील- नरेंद्र मोदी

Ram Mandir | ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’; प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीचं पहिलं दर्शन

Stock Market | प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित शेअर बाजार बंद; ‘या’ दिवशी होणार पुन्हा सुरू

Ram Mandir Pran Pratishtha | बॉलिवूडचे तिन्ही खान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून वंचित; ‘या’ स्टार्सला नाही मिळालं निमंत्रण

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now