गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तकी पूजा अडकली नव्या वादात; नेमकं काय आहे लॉज कनेक्शन?

On: September 16, 2025 12:38 PM
Govind Barge Case
---Advertisement---

Govind Barge Case | बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge Case) मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील नर्तकी पूजा गायकवाड (Pooja gaikwad) सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून, पोलिसांच्या कसून चौकशीतून तिच्या आणि गोविंदच्या नात्याचे अनेक पैलू समोर आले आहेत.

लॉज कनेक्शन आणि प्रेमसंबंधांची कबुली :

पोलिसांनी मिळवलेल्या कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये गोविंद आणि पूजामधील घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. चौकशीत पूजाने कबूल केले की, ते केवळ कलाकेंद्रापुरते मर्यादित न राहता कधी घरी, कधी फ्लॅटवर, तर कधी बीड आणि वैराग परिसरातील लॉजवरही भेटत असत. यामुळे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. (Govind Barge Case Update)

गोविंद बर्गे पूजाच्या प्रेमात इतका गुंतला होता की त्याने तिला पैसे, दागिने, महागडे मोबाईल आणि घर घेण्यासाठी आर्थिक मदत केली होती. इतकंच नव्हे तर जमिनीचे व्यवहार करून दिल्याची माहितीही आधीच समोर आली होती. मात्र, अलीकडे पूजाने त्याच्याकडे गेवराईतील बंगला आणि जमिनीचे नाव बदलण्याची मागणी केली. गोविंदने नकार दिल्यानंतर पूजाने त्याला ब्लॅकमेल करणे आणि धमक्या देणे सुरू केले, असे तपासातून उघड झाले आहे.

Govind Barge Case | घातपात की अजून काही? :

या सततच्या दबावामुळे गोविंद नैराश्यात गेला आणि अखेर सासुरे गावात कारमध्ये बसून त्याने गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, गोविंदचे नातेवाईक आणि मित्र आत्महत्येचा हा दावा फेटाळून लावत आहेत.

त्यांच्या मते, गोविंदकडे शस्त्र नव्हते, मग पिस्तूल कुठून आले? असा प्रश्न विचारत ते घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत. पोलिस आता या दृष्टीनेही तपास करत आहेत. (Govind Barge Case)

या प्रकरणात केवळ पूजाचीच नव्हे तर तिच्या सहकाऱ्यांची आणि मैत्रिणींची जबाबदारी नोंदवली जात आहे. चौकशीतून नवे पुरावे आणि माहिती सतत समोर येत असल्याने संपूर्ण प्रकरण अधिक गूढ बनले आहे.

News Title: Govind Barge Case: Shocking Lodge Connection of Dancer Pooja Gaikwad Revealed in Police Investigation

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now