LPG गॅसचं टेन्शन मिटलं? केंद्र सरकारने दिली सर्वात मोठी गुड न्यूज

On: March 13, 2026 4:20 PM
LPG Distribution Rules
---Advertisement---

LPG Cylinder News | जगभरात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम कच्च्या तेलासह एलपीजीच्या पुरवठ्यावरही झाला असून भारतात अनेक ठिकाणी गॅस टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत सामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

सरकारने एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशात गॅसची कमतरता भासू नये यासाठी केंद्राने आता नवीन देशांकडून एलपीजी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात गॅस सिलेंडरची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नव्या देशांकडून LPG आयात करण्याचा निर्णय :

सरकारने एलपीजीचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशिया यांसारख्या देशांकडून अतिरिक्त एलपीजी आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय ज्या आखाती देशांकडून सध्या पुरवठा शक्य आहे, तेथूनही खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे. (LPG Gas Shortage India)

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी आयातदार आहे. सध्या जागतिक पातळीवर मर्यादित पुरवठ्याचे आव्हान असले तरी देशातील नागरिकांना गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

LPG Cylinder News | उद्योगांसाठी पर्यायी इंधनाचा सल्ला :

गॅसचा वापर कमी करण्यासाठी सरकारने काही तात्पुरते उपायही सुचवले आहेत. पर्यावरण मंत्रालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना सल्ला दिला असून हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राला एका महिन्यासाठी बायोमास, केरोसिन किंवा कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे घरगुती एलपीजीचा वापर प्राधान्याने नागरिकांसाठी उपलब्ध राहू शकतो. (LPG Cylinder News)

दरम्यान, सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करून रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच औद्योगिक वापरासाठी होणारी विक्री काही प्रमाणात कमी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील सुमारे 33 कोटी घरांना गॅसचा पुरवठा सुरळीत राहील, असा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

News Title: Government Big Decision On LPG Import To Avoid Gas Shortage In India

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now