‘…तर त्याला तूडवून काढा’; गोपीचंद पडळकरांचा इशारा

On: October 13, 2023 6:04 PM
---Advertisement---

जळगाव | धनगर समाज बांधवांकडून शुक्रवारी शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात धनगर जागर यात्रेचे आयोजनथे करण्यात आलं होतं. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आरक्षणावर भाष्य केलं आहे.

धनगर समाजासाठीच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, आता येथून आपल्याला सर्व पक्षभेद, गट-तट विसरून समाजासाठी, समाजाच्या आरक्षणासाठी काम करावं लागणार आहे. धनगर आरक्षणाबाबत जर आता कोणी आडवं आलं, तर त्याला तूडवून काढा, असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

आता ही हक्काची लढाई सुरु झाली असून, कोणी कितीही विरोध केला तरी आता आपल्याला थांबायचं नसल्याचं पडळकर म्हणाले आहेत.

आरक्षणासाठी आता न्यायालयीन लढाई सुरु झाली असून, आरक्षणाबाबत सुरु असलेल्या याचिकेवर डिसेंबर महिन्यात निर्णय येण्याची शक्यता गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now