गुगल पिक्सेल वापरकर्त्यांसाठी खुशखबर; नवीन अपडेट आलंय, जाणून घ्या

On: February 6, 2025 3:38 PM
Google Pixel
---Advertisement---

Google Pixel l गुगलने (Google) बुधवारी पिक्सेल डिव्हाइसेससाठी (Pixel Devices) फेब्रुवारी 2025 चे नवीन अपडेट (New Update) जारी केले. हे नवीन OTA अपडेट कंपनीने Pixel 9 सीरीज, Pixel Tablet आणि Android 15 वर चालणाऱ्या इतर जुन्या डिव्हाइसेससाठी उपलब्ध करून दिले आहे. या नवीन अपडेटसह, कंपनीने ऑडिओ (Audio) आणि ब्लूटूथशी (Bluetooth) संबंधित समस्या दूर केल्या आहेत. याशिवाय, सॉफ्टवेअरमधील त्रुटी (Vulnerability) दूर करणारा एक सुरक्षा पॅचदेखील (Security Patch) यात मिळत आहे.

नवीन अपडेटमध्ये काय खास? :

एका सपोर्ट पेजवर (Support Page), गुगल कम्युनिटी मॅनेजरने (Google Community Manager) फेब्रुवारी 2025 साठीच्या पिक्सेल अपडेटची माहिती दिली आहे. जागतिक मॉडेलसाठी (Global Model) याचा बिल्ड नंबर AP4A.250205.002 आहे. चेंजलॉगनुसार (Changelog), नवीन अपडेटमुळे Pixel 6 ते Pixel 9 Pro Fold पर्यंतच्या डिव्हाइसेसवरील Android Auto मधील ऑडिओ आउटपुटवर (Audio Output) परिणाम करणाऱ्या एका मोठ्या समस्येचे निराकरण झाले आहे.

Google Pixel l ब्लूटूथ कनेक्शन (Bluetooth Connection) केले फिक्स:

हे अपडेट आणखी एक बग (Bug) दुरुस्त करते, ज्यामुळे कधीकधी काही ब्लूटूथ डिव्हाइसेस किंवा अ‍ॅक्सेसरीजशी (Accessories) कनेक्शन थांबत होते. ही समस्या केवळ Pixel 9 सीरीजसाठी असल्याचे म्हटले जात होते आणि फेब्रुवारी 2025 च्या अपडेटसह ती दुरुस्त करण्यात आली आहे. बग फिक्स व्यतिरिक्त, चेंजलॉगमध्ये असे म्हटले आहे की, अपडेट एक सिक्योरिटी पॅच ऑफर करते.

अपडेटचा आकार:

अपडेट रोल आउट (Roll Out) होण्यास सुरुवात झाली आहे. Google Pixel 9 वर, त्याचा आकार फक्त 15.48MB आहे, परंतु तो मॉडेलनुसार बदलू शकतो.

‘या’ उपकरणांसाठी अपडेट जारी:

Google Pixel 9 सीरीज
Google Pixel 8 सीरीज
Google Pixel Tablet
Google Pixel Fold
Google Pixel 7 सीरीज
Google Pixel 6 सीरीज

सुरक्षा पॅच का आवश्यक? :

जर तुम्हाला अपडेटमध्ये बग फिक्ससह (Bug Fix) सुरक्षा पॅच मिळाला असेल, तर ते ताबडतोब अपडेट करा. कारण कंपन्या त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) किंवा सॉफ्टवेअरची (Software) सुरक्षा राखण्यासाठी ते रिलीज करतात. सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) ज्या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात, त्या दूर करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

News title : Google Pixel February 2025 Update: Fixes Audio and Bluetooth Issues

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now