ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर!

On: February 21, 2023 12:34 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढील सुनावणी व्हावी का याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली.

अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी  होणार आहे, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. पण यावर उद्या सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या 5 जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now