शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने दिली गुड न्यूज

On: February 28, 2024 11:37 AM
Money Finance
---Advertisement---

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून सरकार शेतकरी वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम करताना दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6 हजार रूपये देण्यात येतात. तर त्यातील चार महिन्याला 2 हजार रूपये शेतकऱ्याच्या अकाऊंटवर पाठवले जातात.

15 वा हप्ता हा 2023 मध्ये देण्यात आला. आता 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना आज पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा कार्यक्रम आहे. याठिकाणी ते कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा करतील. 16 हप्ता आज 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसानच्या संकेतस्थळानुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

मोदी सरकारने 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये जमा केले आहेत.

ऑनलाईन पद्धतीने यादीत नाव पाहता येणार

pmkisan.gov.in या वेबसाईटला जाऊन भेट द्यावी. बेनिफिशियरीमध्ये जावं आणि त्याठिकाणी क्लिक करून वेबसाईटखालील निवडक पर्याय निवडावा. त्यानंतर गेट रिपोर्ट यावर क्लिक करावं आणि त्याठिकाणी लाभार्थ्यांची यादी समोर येईल.

PM Kisan Yojana | बॅलेन्स स्टेट्स मिळवण्यासाठी करा ‘हे’

अधिकृत pmkisan.gov.in संकेतस्थळावर जात फार्मर्स कॉर्नरमध्ये जावून त्यातील बेनिफिशिअरी या पर्यायावर क्लिक करा. आपला आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर गेट स्टेट्स वर क्लिक करावं आणि त्यानंतर स्क्रिनवर डिटेल्स समोर येतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘अंकितासोबत लग्न…’; विकी जैनचा धक्कादायक खुलासा

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!

बुमराहची एन्ट्री! स्टार खेळाडूला विश्रांती; अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल

विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now