Gold Stock Rules | भारतीय नागरिकांसाठी सोने ही एक मोठी आर्थिक आणि भावनिक संपत्ती आहे. सोन्यातील गुंतवणूक हा नेहमीच एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. दसऱ्यापर्यंत १ लाख २१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. भारतात विविध सणांच्या दिवशी सोने खरेदी करण्यावर भर असतो. लग्न आणि इतर समारंभामध्ये सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं.
मात्र सोन्याच्या बाबतीतला हा नियम अनेकांना माहीतच नसतो. घरी सोन्याचा किती साथ करायचा याबाबदल आयकर विभागाचे काही नियम आहते. त्यांचे पालन नाही केले तर, आयकर विभागाकडून (Income Tax Department) चौकशी होऊ शकते तर काही वेळा आयकर विभाग छापा देखील टाकू शकतो. (Gold Stock Rules)
घरी सोनं किती ठेवायचं :
जर एखाद्या नागरिकांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सोन्याचा साठा केला आणि तो कायदेशीर उत्पन्नातून खरेदी केल्याचे सिद्ध करू शकले नाही, तर त्याची आयकर विभागाकडून चौकशी (inquiry) होऊ शकते. काही वेळा आयकर विभाग छापा (raid) देखील टाकू शकतो. भारतात सोने खरेदी आणि सोनं घरी ठेवण्याचे नियम वेगवेगळे आहेत. पुरुष, विवाहित महिला आणि अविवाहित महिलांसाठी वेगवेगळे नियम आहेत. विवाहित महिलांना त्यांच्याजवळ ५०० ग्रॅम सोनं ठेवण्याची परवानगी आहे. अविवाहित महिलांना २५० ग्रॅम तर पुरुषांना १०० ग्रॅम सोनं घरी ठेवण्याची परवानगी आहे. (Gold Stock Rules)
जर तुमच्याकडे या मर्यादेपक्षा अधिक सोनं असेल तर त्याचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्न डिक्लेरेशनमध्ये असलं पाहिजे. जर, तुमच्याकडे योग्य पुरावे असतील तर तुम्ही कितीही प्रमाणात सोनं साठवू शकतात. आयकर विभागाची मर्यादा कागदपत्राशिवायच्या सोन्यावर लागू असते. म्हणजेच सोनं कितीही असलं तरी त्याचे पुरावे असणं आवश्यक आहे.
Gold Stock Rules | वैध पुरावे आवश्यक :
तुम्ही तुमच्या घोषित उत्पन्नातून सोने खरेदी करत असाल किंवा सोने खरेदी कर मुक्त उत्पन्न म्हणजेच शेती उत्पन्नातून केली असेल, किंवा सोने कायदेशीरपणे वारस म्हणून मिळालेलं असेल तर कर लागणार नाही.
जर, तुम्ही निश्चित मर्यादेत सोने साठवता किंवा त्यापेक्षा अधिक सोनं तुमच्याकडे असेल त्याचे वैध पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत. या स्थितीत जर छापेमारी झाली तर सोने जप्त केलं जात नाही. घरी साठवलेल्या सोन्यावर कोणताही कर लागत नाही. (Gold Stock Rules) मात्र, सोन्याची विक्री करत असाल तर त्यावेळी कर द्यावा लागतो.






