ग्राहकांसाठी आनंदवार्ता! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे रेट

On: April 30, 2024 12:25 PM
Gold-Silver Rate Today April 30 
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | एप्रिल महिन्याच्या अखेरच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 30 एप्रिल रोजी सोन्याच्या भावात मोठी घट झाली आहे. या महिन्यात सोन्याने दरवाढीचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. आज मात्र सोन्याच्या भावात नरमाई दिसून आली.

सोन्याच्या भावात 23 एप्रिलला 1530 रुपयांची मोठी घसरण झाली होती. 24 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी वाढले. नंतर सोनं 350 रुपयांनी स्वस्त झालं. 26 एप्रिल रोजी 400 तर 27 एप्रिलला 200 रुपयांनी किंमती वधारल्या. तर, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 30 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एप्रिलचा दरवाढीचा आलेख पाहता अखेरच्या सत्रात ग्राहकांना दिलासा मिळाल्याचं दिसून येतंय.

चांदीने घेतली माघार

एप्रिलच्या अखेरच्या सत्रात चांदीनेही मोठा दिलासा दिला आहे. गेल्या  (Gold-Silver Rate Today) आठवड्यात एकदाच चांदीने 2 हजारांची उसळी घेतली. तर 4500 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.

कॅरेटचा भाव काय असणार?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 72,373 रुपये, 23 कॅरेट 72,083 रुपये, 22 कॅरेट सोने 66,294 रुपये झाले. 18 कॅरेट 54,280 रुपये, 14 कॅरेट सोने 42,339 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today April 30 

महत्त्वाच्या बातम्या-

“नकली शिवसेना म्हणायला ती काय मोदीजी तुमची डिग्री आहे का?”

पतंजलीला मोठा झटका, ही उत्पादनं वापरत असाल तर काळजी घ्या!

Covishield लस घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! रक्ताच्या गाठींसह होणार मोठे आजार

अमोल कोल्हेंच टेन्शन वाढलं! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका

Join WhatsApp Group

Join Now