Gold-Silver Rate Today | मार्च आणि एप्रिलचा महिना मौल्यवान धातूने गाजवला. सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसून आली. या दोन महिन्यात दरवाढीचे अनेक विक्रम तुटले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस थोडा फार दिलासा मिळाला होता. सोनं 70 हजारी पार गेलं होतं. मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली होती.
आज 5 मे रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आठवड्याच्या अखेरीस सोने किंचित वधारले तर चांदीने दिलासा दिला आहे. 29 एप्रिलला सोने 300 रुपयांनी घसरले. दुसऱ्या दिवशी किंमती जैसे थे होत्या.1 मे रोजी सोने 1,000 रुपयांनी दणकावून आपटले.
काल 4 मे रोजी सोने 100 रुपयांनी वधारले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचे भाव जैसे थे
या आठवड्याच्या (Gold-Silver Rate Today) सुरुवातीला 29 एप्रिल रोजी चांदीच्या दरात काहीच बदल झाले नाही. 30 एप्रिलला चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 1 मे रोजी किंमती जैसे थे होत्या. 2 मे रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर भाव जैसे थेच आहेत.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.
कॅरेटचा भाव ‘असा’ असेल
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,191 रुपये, 23 कॅरेट 70,906 रुपये, 22 कॅरेट सोने 65,211 रुपये झाले. 18 कॅरेट 53,393 रुपये, 14 कॅरेट सोने 41,647 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title : Gold-Silver Rate Today 5 May 2024
महत्त्वाच्या बातम्या-
पाण्यावरून राजकारण तापलं; सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘कोणी माईका लाल…’
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनदर
भन्नाट फीचर्ससह महिंद्रा कंपनीची कार लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये
कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचायं ? तर Vivo कंपनीची जबरदस्त सिरीज लाँच
…तर आता मला मोदींच्या काही गोष्टी पटत आहेत; राज ठाकरेंचं भुवया उंचवणार वक्तव्य






