पाण्यावरून राजकारण तापलं; सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘कोणी माईका लाल…’

On: May 5, 2024 12:11 PM
Supriya Sule
---Advertisement---

Baramati Loksabha 2024 | बारामती लोकसभा (Baramati Loksabha 2024) निवडणूक तोंडावर आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे. या मतदारसंघाकडे केवळ राज्याचंच नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांचा बारामती बालेकिल्ला मिळवण्यासाठी भाजपने कुटुंब आणि पक्षात उभी फूट पाडली असल्याचा विरोधकांचा दावा आहे. यापार्श्वभूमीवर बारामती लोकसभा (Baramati Loksabha 2024) मतदारसंघाच्या रिंगणात संसद रत्न सुप्रिया सुळे विरूद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची आज बारामती मतदारसंघातील (Baramati Loksabha 2024) दौंड येथे प्रचारसभा झाली. या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीये. कोणी माईका लाल दौंड आणि बारामतीचं पाणी बंद करतो ते बघतेच. कॅनेल कोणाच्या घरचा नाही, माझ्या शेतकऱ्यांचा आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

अजितदादा यांनी अनेक सभांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील भाषणावर वक्तव्य केलं. संसदेत भाषण केल्याने विकास होत नाही असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांचं नाव न घेता अजित पवार यांच्यावर पलटवार केला. त्या म्हणाल्या की “तुम्हाला बाकं वाजणारा पाहिजे की संसदेत जाऊन प्रश्न मांडणारा उमेदवार पाहिजे हे तुम्ही ठरवा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. (Baramati Loksabha 2024)

“भाषण करूनच विकास होतो”

“दौंडला मी महिन्यातून एकदा तरी येतेच मी आभार मानते की आपण मला तीन वेळा संसदेत पाठवलं. मी पक्ष नाही बदलला. आपलं चिन्हं बदललं गेलं आहे. लोकं माझ्यावर टीका करतात म्हणतात संसदेत भाषण करून विकास होतो का? तर हो भाषण करून विकास होतो. ही लोकशाही आहे तुमचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी मी भाषण करते,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“जर कुणी आडवत असेल तर बघते”

“आज दौंडमध्ये दमदाटी करत आहेत. पाणी बंद करू…धमक्या देतात. पाणी तुमचं नाही कॅनल तुमच्या घरचा नाही शेतकऱ्यांचा आहे. कोणीच माईका लाल दौंड आणि बारामतीचं पाणी बंद करणार नाही. तुमचा ऊस पण कोणी आडवणार नाही. जर कुणी आडवत असेल तर बघते,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली असून मतदार संभ्रम अवस्थेत आहेत. नक्की मत कोणाला द्यायचं अशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरीही बारामतीकर आपला विजयाचा कौल कोणत्यातरी एकाच उमेदवाराला देतील. ही चुरशीची लढत होणार असून करो या मरो, अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे.

News Title – Baramati Loksabha 2024 Supriya Sule Aggressive On Ajit Pawar At Daund 

महत्त्वाच्या बातम्या

“शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर काढलं…”, व्हिडीओत नेमकं काय?

सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अमोल कोल्हेंचा मोठा डाव म्हणत शिवाजी आढळरावांची माघार, यापुढे कोल्हेंना उत्तर देणार नाही!

लग्नाआधी बच्चन कुटुंबीयांनी केली होती ‘ही’ मागणी, ऐश्वर्याने दिलेला नकार

“दादा तुमच्यात धाडस असेल तर..”, रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान

Join WhatsApp Group

Join Now