Gold-Silver Rate Today | मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. पण, 21 मार्च रोजी सोने आणि चांदीने तेजी घेतली.
आता या आठवड्यात सोन्याच्या भावात 1500 रुपयांची वाढ झाली तर चांदीने या आठवड्यात 2800 रुपयांची भरारी घेतली. यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दीही कमी दिसून आली. 22 मार्च रोजी याच्या किंमती 450 रुपयांनी उतरल्या. तर 23 मार्च रोजी किंमती 110 रुपयांनी उतरल्या.
सोन्याचे भाव उतरले
मागच्या आठवड्यात म्हणजेच 18 मार्च रोजी 210 रुपयांची घसरण (Gold-Silver Rate Today) झाली होती.तर 19 मार्च रोजी सोन्याच्या किंमती 460 रुपयांनी वाढल्या. या आठडव्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी वधारली
18 मार्च रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली होती. तर, 19 मार्च रोजी पुन्हा त्यात वाढ झाली. 20 मार्च रोजी चांदीच्या किंमती 300 रुपयांनी कमी झाल्या. 21 मार्च रोजी पुन्हा 1500 रुपयांनी चांदी वधारली. तर, 22 मार्च रोजी चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली.23 मार्च रोजी यात 1000 रुपयांची वाढ झाली. आता किलो चांदीचा भाव आता 77,500 रुपये आहे.
‘असा’ असेल कॅरेटचा भाव
गुडरिटर्न्सनुसार (Gold-Silver Rate Today) 24 कॅरेट सोने 66,268 रुपये, 23 कॅरेट 66,003 रुपये, 22 कॅरेट सोने 60,702 रुपये झाले.18 कॅरेट 49,701 रुपये, 14 कॅरेट सोने 38,767 रुपये प्रति 10 ग्रॅमवर झाले आहे.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold-Silver Rate Today) आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title- Gold-Silver Rate Today 25 March
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला
भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?
लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video






