ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

On: March 20, 2024 10:10 AM
Gold-Silver Rate Today 20 march
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | सोने आणि चांदीने तेजी घेतली आहे. मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दीही कमी दिसून येत आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना पहिल्या दिवशी दिलासा दिला होता.

दुसऱ्या दिवशी एकदम उसळी घेतली. या आठवड्यामध्ये चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. या दोन दिवसांत चढउतार दिसून आला. 11 ते 18 मार्च दरम्यान या धातूंनी दरवाढीला ब्रेक लावला. आज (20 मार्च) सोने आणि चांदी दोन्हीमध्ये वाढ झाली आहे.

सोन्याच्या भावात तेजी

या आठवड्यामध्ये सोन्याच्या भावात 620 रुपयांची घसरण झाली. 18 मार्च रोजी 210 रुपयांची घसरण झाली होती.तर 19 मार्च रोजी सोन्याच्या किंमती 460 रुपयांनी वाढल्या. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या किंमतीतही वाढ

या महिन्याची सुरुवातीलाच (Gold-Silver Rate Today) चांदीमध्ये 3 हजारांची वाढ झाली होती. 12 मार्च रोजी 500 रुपये, 14 मार्च रोजी चांदीने 1800 रुपये तर 16 मार्च रोजी 300 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यामध्ये म्हणजेच 18 मार्च रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली होती. तर, 19 मार्च रोजी पुन्हा त्यात वाढ झाली. आता एक किलो चांदीचा भाव 77,300 रुपये झाला आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

गुडरिटर्न्सनुसार 24 कॅरेट सोने 65,589 रुपये, 23 कॅरेट 65,326 रुपये, 22 कॅरेट सोने 60,080 रुपये झाले.18 कॅरेट 49,192 रुपये, 14 कॅरेट सोने 38,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर झाले आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold-Silver Rate Today) आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही.तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today 20 March

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात सरकारी नोकरीची संधी! 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज

आमलकी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा

आजचे राशिभविष्य! ब्रह्म व इंद्र योगाने आजचा दिवस होईल शक्तिशाली

 

Join WhatsApp Group

Join Now