Gold-Silver Rate Today | पितृपक्ष सुरू होताच मौल्यवान धातूमध्ये घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीमध्ये घसरण दिसून आली आहे. मागच्या आठवड्यात सोन्याने चांगलीच उसळी घेतली होती. सोने 900 तर चांदी 8,600 रुपयांनी वधारले होते. या आठवड्यात मात्र, घसरण दिसून आली. आज 19 सप्टेंबररोजी सकाळच्या सत्रात देखील घसरणीचे संकेत मिळाले. (Gold-Silver Rate Today)
17 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी उतरले. तर 18 सप्टेंबररोजी त्यात 160 रुपयांची घसरण झाली. सोने एकूण 270 रुपयांनी स्वस्त झाले. आजही सोने काही अंशी खाली उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मागच्या आठवड्यात चांदीत 7 हजारांपेक्षा अधिकची वाढ झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदीत पुन्हा हजार रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी प्रत्येकी एक हजारांनी चांदी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,257, 23 कॅरेट 72,964, 22 कॅरेट सोने 67,103 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,943 रुपये, 14 कॅरेट सोने 42,855 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. (Gold-Silver Rate Today)
पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त कधी असणार?
शास्त्रात पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य मानले जाते. मात्र, पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानली जाते. (Gold-Silver Rate Today)
घरबसल्या जाणून घ्या भाव-
ग्राहक घरी बसल्या देखील सोने आणि चांदीच्या किंमती जाणून घेऊ शकतात. स्थानिक कर तसेच इतर करांमुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येऊ शकते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार या दिवशी किंमती जाहीर होत नाहीत. (Gold-Silver Rate Today)
News Title : Gold-Silver Rate Today 19 September 2024
महत्वाच्या बातम्या –
ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार
आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर
तिरुपतीच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी?, चंद्राबाबूंचा धक्कादायक आरोप
आता पालकांसह मुलांचंही भविष्य होणार सुरक्षित; मोदी सरकारने आणली भन्नाट स्कीम
आजचा गुरुवारचा दिवस शुभ की अशुभ?, वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य






