मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा

On: March 1, 2024 1:02 PM
Gold-Silver Rate Today 1 March
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातूच्या किंमतीत या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या भावात चढउताराचा ट्रेंड (Gold-Silver Rate Today) दिसून आला होता.

मागच्या आठवड्यात चांदी हजार रुपयांनी स्वस्त झाली होती, आता मात्र चांदी चकाकली आहे. चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आता सोन्याची किंमत किंचित कमी झाली, तर चांदी 300 रुपयांनी वधारली आहे.

आज (1 मार्च) सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आज चांदीची किंमत वाढली आहे. तर, सोन्याने थोडाफार दिलासा दिला आहे. आजचे सोने-चांदीचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत. सोन्याचा भाव काही अंशी कमी झाल्याने आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

आजचे सोने-चांदीचे दर

26 फेब्रुवारी रोजी सोने 160 रुपयांनी स्वस्त झाले. 28 फेब्रुवारीला सोन्याच्या भावात किंचित 10 रुपयांची घसरण झाली. मात्र, 29 फेब्रुवारीला किंमतीत बदल झाला नाही. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate Today) सोने-चांदीच्या (Gold-Silver Rate Today) कॅरेटनुसार किंमती ठरल्या आहेत.

त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 57,740 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीच्या किमती मात्र वाढल्या आहेत. 26 फेब्रुवारीला चांदी 400 रुपयांनी स्वस्त झाली. 27 फेब्रुवारीला 500 रुपयांची घसरण झाली. 28 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी किंमत उतरली. 29 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या.

चांदीचे भाव वधारले

गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव (Gold-Silver Rate Today)आता 74,200 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today 1 March

महत्वाच्या बातम्या-

सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ

‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले

चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट!

पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत

Join WhatsApp Group

Join Now