Today Gold Price | जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये पुन्हा हालचाल दिसून येत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. 25 फेब्रुवारी रोजी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
एमसीएक्सवर दरात उसळी :
भू-राजकीय अनिश्चिततेचा थेट परिणाम कमोडिटी बाजारावर उमटताना दिसतोय. 25 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या दरात सुमारे 0.54 टक्क्यांची वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅम किंमत 1,60,833 रुपयांवर पोहोचली. चांदीच्या वायदा व्यवहारातही मोठी तेजी दिसून आली. चांदीचा दर 2 टक्क्यांहून अधिक वाढत प्रति किलोग्रॅम 2,66,189 रुपयांवर गेला. (Today Gold Price News)
दरम्यान, आज सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,61,160 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झाली. त्याचवेळी चांदीच्या दरात 5,800 रुपयांची भर पडून ती 2,67,110 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना दरातील या चढ-उताराकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
Today Gold Price | आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती :
जागतिक बाजारात मात्र मिश्र चित्र पाहायला मिळाले. 25 फेब्रुवारीच्या सकाळी स्पॉट सिल्व्हरमध्ये (Silver Rate) 2.99 टक्क्यांची वाढ होऊन दर 89.4 डॉलर प्रति औंस इतका झाला. दुसरीकडे स्पॉट गोल्डमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण झाली आणि त्याची किंमत 5,185 डॉलर प्रति औंसवर आली.
सध्या जागतिक आर्थिक अस्थिरता, मध्यवर्ती बँकांचे धोरणात्मक निर्णय, अमेरिका-इराणमधील तणाव आणि चलन विनिमय दर यांसारख्या घटकांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर प्रभाव पडत आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची निवड करतात, त्यामुळे दरांना आधार मिळतो. (Gold Price Today)
पुढील काळात डॉलर-रुपया विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि देशांतर्गत मागणी यावर किंमतींची दिशा अवलंबून राहणार आहे. रुपया कमकुवत राहिला किंवा लग्नसराईमुळे मागणी वाढली तर दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






